Lip Care In Winter | हिवाळ्यात ‘या’ घरगुती पध्दतीनं घ्या ओठांची काळजी, फाटण्याची तर अजिबातच भिती नाही; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Lip Care In Winter | हिवाळ्यात कशी घ्यावी ओठांची काळजी : हिवाळ्याच्या काळात त्वचा कोरडी आणि निर्जीव होणे सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत, ओठ फुटण्याची समस्या देखील लक्षणीय वाढते. कधी कधी ही समस्या इतकी गंभीर होते की ओठांमधून रक्त ही येते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक व्हॅसलीन (Vaseline), जेली (Jelly), लिप बाम ( Lip Bam) यांसारख्या गोष्टींचा आधार घेतात, पण तरीही आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत, फाटलेले ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा वापर करू शकता. चला जाणून घेऊया या घरगुती उपायांबद्दल. (Lip Care In Winter)
(Lip Care In Winter)

 

1. ओठांवर बदामाचे तेल लावणे
बदामाचे तेल फाटलेल्या ओठांपासून आराम देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर बदामाचे तेल लावा आणि काही वेळ ओठांना मसाज करा. यामुळे ओठांना ओलावा मिळेल तसेच त्वचा मुलायम आणि गुलाबी होईल.

 

2. खोबरेल तेल वापरणे
दिवसातून दोन ते तीन वेळा ओठांवर खोबरेल तेल लावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वीही याचा वापर ओठांवर करा. यामुळे त्वचा मुलायम होईल आणि ओठांच्या दुखण्यापासूनही आराम मिळेल.

3. हळद लावणे
ओठातून रक्त येत असल्यास तुम्ही हळद वापरू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाव चमचा दुधात दोन चिमूट हळद मिसळून ओठांवर लावा. यामुळे ओठांचे भेगाही भरतात,आणि त्वचाही मुलायम आणि गुलाबी होते.

 

4. मध लावणे
ओठांवर मध लावल्याने ओठ फाटण्याची समस्या सहज दूर होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मधाने मसाज करा. याने ओठांच्या भेगा भरण्यास सुरुवात होईल, ओठ मऊ होतील, तसेच वेदनांचा त्रासही कमी होईल. (Lip Care In Winter)

 

5. साखरेसोबत मध ओठांवर लावणे
ओठांवरून बाहेर पडणारी डेड स्किन (Dead skin) काढण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
यासाठी दोन चिमूटभर साखरेत दोन थेंब मध मिसळून ओठांवर स्क्रब (Scrub) म्हणून वापरा.
यामुळे फाटलेले ओठ ठीक होतील, तसेच ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

 

6. ओठांवर क्रीम लावा
फाटलेले ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी क्रीम देखील खूप प्रभावी आहे.
यासाठी झोपण्यापूर्वी ओठांवर क्रीम लावून दोन-तीन मिनिटे ओठांना मसाज करा.
ह्या पर्यायाने फाटलेले ओठ सुंदर, मऊ आणि गुलाबी होतील.

 

ह्या काही सध्या सोप्प्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही तुमच्या ओठांची सुंदरता सहज वाढवू शकता.

 

 

Web Title :- Lip Care In Winter | lips care in winter how to get rid of cracked lip problem with home remedies
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरण! देवेंद्र फडणवीसच मुख्य साक्षीदार; राज्य सरकारचा न्यायालयात दावा

Water Drinking Habits | पाणी पिण्याने सुद्धा होऊ शकते का नुकसान? केव्हा, कसे आणि का जाणून घ्या 5 योग्य पध्दती

Bombay High Court | ‘रात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे विनयभंगच’