2000 रुपयांची लाच स्विकारताना पुणे पाटबंधारे विभागातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कामातील कसूर अहवाल वरिष्ठांकडे पाठवुन कारवाई होऊ न देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पुणे पाटबंधारे विभागाच्या पुणे कार्यालयातील लिपिकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज करण्यात आली. निलेश वसंत मोडक (वय- 38) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी पाटबंधारे विभागातील एका लिपिकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार हे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग पुणे कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्याकडे असलेली शासकीय कामे प्रलंबित असल्याचा कसूरी अहवाल पाठवून त्यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई होऊ नये यासाठी निलेश मोडक याने दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने आज पडताळणी केली. पडताळणीमध्ये निलेश मोडक याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने पुणे येथील पाटबंधारे कार्यालयात सापळा रचून मोडक याला तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. निलेश मोडक याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे करीत आहेत. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

visit : policenama.com