काय सांगता ! होय, व्हॅक्सीन सर्टिफिकेट शिवाय मिळणार नाही दारू, दुकानांवर लावले पोस्टर

इटावा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात दारूच्या दुकानांची तातडीने तपासणी केली जात आहे. अलीगढमध्ये विषारी दारूच्या घटनेनंतर राज्यात प्रशासन आणि पोलीस अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. ठिकठिकाणी दारूच्या liquor दुकानांची तपासणी केली जात आहे.

Lockdown in Maharashtra : ‘नाईलाजानं जनतेवर निर्बंध लादण्याचं काम करावं लागतंय, राज्यात निर्बंध 15 जूनपर्यंत कायम राहणार’ – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

याच पार्श्वभूमीवर सैफईमध्ये तैनात एसडीएम हेम कुमार सिंह यांनी आपल्या विभागात पोलीस पथकासह दारूच्या liquor दुकानांची चेकिंग केली. सोबतच त्या दारूच्या दुकानांवर पोस्टर चिटकवले. पोस्टरवर लिहिले आहे की, लोकांना दारूची विक्री तेव्हाच केली जावी जेव्हा ते आपले कोरोना व्हॅकसीनचे प्रमाणपत्र दाखवतील. अगोदर व्हॅक्सीन घ्या, त्यानंतर दारू खरेदी करण्यासाठी या. एसडीएमने दुकानदारांना सक्त ताकीद दिली की, व्हॅक्सीनेशन प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय कोणत्याही प्रकारची दारू विक्री केली जाऊ नये. सर्वात प्रमुख गोष्ट ही आहे की, देशात केवळ तीन टक्के व्हॅक्सीनेशन नंतर टार्गेट वाढवण्यासाठी आता अधिकारी विविध प्रकारचे उपाय योजत आहेत. महसूल वाढवण्यासाठी दारूच्या दुकानांचा हातभार लागतो, आता व्हॅक्सीनेशन वाढवण्यासाठी सुद्धा दारूच्या दुकानांचा आधार घेतला जात आहे.

एसडीएम हेम कुमार सिंह यांनी पोलीस पथकासह दारू दुकानांची तपासणी केली. दुकानदारांचे म्हणणे आहे की, एसडीएम साहेब आले होते. पोस्टर लावून गेले आहेत. सोबत हे सुद्धा सांगून गेले की, विना व्हॅक्सीनेशन प्रमाणपत्र कुणालाही दारूची विक्री करू नये. आता आम्ही लोकांना व्हॅक्सीनेशन करण्यास सांगत आहोत. अनेक लोक व्हॅक्सीनेशन प्रमाणपत्राशिवाय सुद्धा आले त्यांना परत पाठवण्यात आले. उत्पादन शुल्क अधिकार्‍याने सांगितले की, दारूच्या दुकानांसाठी ग्राहकांना व्हॅक्सीनेशन करण्याचा कोणताही अधिकृत आदेश नाही. परंतु सैफईचे एसडीएम जर असे करत आहेत तर ते स्वविवेकाने करत आहेत. व्हॅक्सीनेशनसाठी प्रोत्साहित करणे चांगली गोष्ट आहे परंतु दारूच्या विक्रीसाठी अनिवार्य नाही.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’