‘हे’ स्मार्टफोन वर्षभरात सर्वाधिक विकले गेले, संपूर्ण लिस्ट वाचा

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Apple iPhone XR यावर्षी देखील सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन बनला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी iPhone XS मालिकेसह लाँच करण्यात आला होता. नव्या स्मार्टफोनपेक्षा या स्मार्टफोनची किंमत स्वस्त ठेवण्यात आली होती. हा स्मार्टफोन भारतासह जगभरात लोकप्रिय झाला आहे. काउंटरपॉईंट रिसर्च या संशोधन संस्थेने हा डेटा जाहीर केला आहे. त्यानुसार 2019 च्या तिसर्‍या तिमाहीतही iPhone XR अ‍ॅपल कंपनीचा सर्वाधिक विक्री करणारा स्मार्टफोन बनला आहे. याला सप्टेंबर 2018 मध्ये लाँच करण्यात आले होते, त्यानंतर हा फोन अ‍ॅपलचा सर्वोत्कृष्ट विक्रेता स्मार्टफोन बनविला आहे.

काउंटरपॉईंट रिसर्चनुसार नुकतेच लाँच झालेल्या iPhone 11 पेक्षा लोक iPhone XR अधिक प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे आयफोन iPhone XR ची पुढील आवृत्ती iPhone 11 आहे. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार जगभरात हा एक लोकप्रिय स्मार्टफोन ठरला आहे.

Apple iPhone XR नंतर सॅमसंगच्या स्मार्टफोनने बाजी मारली आहे. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार iPhone XR नंतर Samsng Galaxy A10 आणि Samsng Galaxy A50 आहे. यानंतर Oppo A9 चौथ्या क्रमांकावर आहे. नुकताच लाँच केलेला iPhone 11 या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

टॉप -10 यादीमध्ये Oppo A5s, Galaxy A20 , तसेच Xiaomi Redmi 7A आणि Huawei P30 चा समावेश आहे. हा डेटा जगभरातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनपैकी एक आहे, जो काउंटर पॉईंट रिसर्च फर्मने जारी केला आहे.

तिसर्‍या तिमाहीत हे सर्वाधिक विक्री होणारे स्मार्टफोन आहेत –

1) iPhone XR

2) Samsung Galaxy A10

3) Samsung Galaxy A50

4) Oppo A9

5) iPhone 11

6) Oppo A5s

7) Samsung Galaxy A20

8) Oppo A5

9) Xiaomi Redmi A7

10) Huawei P30

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/