कर्ज वसुलीसाठी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला अटक

भिलवडी : पोलीसनामा ऑनलाइन

सांगली जिल्ह्यात सावकारांची मुजोरी, दहशत वाढली असून या दहशतीविरूद्ध पोलिसांनीही ठोस मोहिम हाती घेतली आहे. कर्जदाराला चाळीस हजाराचे कर्ज वीस टक्के व्याजाने देऊन सुमारे दीडलाख रूपये वसूल करूनही त्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सावकारास भिलवडी पोलिसांनी अटक केली आहे. रणजीत खंडेराव पाटील असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस  दिली आहे.
 [amazon_link asins=’B01ID23U44,B0148OLZNO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’126e7b60-b386-11e8-859e-4dac7144225a’]

उल्हास दत्तू जाधव (रा. भिलवडी स्टेशन) यांना रणजीत पाटील (रा. यळकोट चौक, भिलवडी) याने चाळीस हजार रुपये कर्ज वीस टक्के व्याज दराने दिले होते. पैसे देतेवेळीच पुढील महिन्याचा हप्ता आठ हजार रुपये कपात करुन घेतला होता. तक्रारदाराकडून धनादेश सह्या करुन घेतले होते.

तक्रारदाराने अठरा महिने आठ हजार रुपयांप्रमाणे दरमहा व्याज दिले. एकूण १४४००० रुपये दिले. तरीही पाटील हा जाधव यांना चाळीस हजार मुद्दलीसाठी दमदाटी करत होता. त्यामुळे जाधव यांनी पाटील याला चार हजार रुपये दिले. उर्वरित छत्तीस हजार रकमेसाठी  पाटील याने ३० ऑगस्ट रोजी जाधव यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत जाधव यांनी तक्रार केल्यानंतर भिलवडी पोलिसांनी पाटील याला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून सावकारी संदर्भातील कागदपत्रे जप्त केली.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी दिली आहे.

[amazon_link asins=’B01951R2S2,B015T0YLAA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’492537e6-b388-11e8-8e8a-6b5d1ef51884′]
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, हवालदार सचिन खाडे, आप्पा मोरे, प्रवीण जाधव, गणेश पाटणकर, शिवाजी कोकाटे, शिवाजी गायकवाड यांचे पथक करत आहे. पाटील याने रावसाहेब लक्ष्मण पाटील (रा. किणीकर मळा, भिलवडी स्टेशन), मारुती  पाटील (रा. तासगाव), सचिन विलास फडतरे (रा. जुळेवाडी) यांनाही २० ते २५ टक्के व्याजदराने पैसे दिले आहेत असे पोलिसांनी सांगितले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

You might also like