मोठा खुलासा ! शास्त्रज्ञांनी शोधून काढली संपुर्ण जगात ‘हाहाकार’ घालणार्‍या ‘कोरोना’ची 3 रूपं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – चीनच्या वुहान आणि हुबेई प्रांतांमधून कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार झाला आहे. या प्राणघातक कोरोना विषाणूमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे, त्यातील अंदाजे 70 टक्के मृत्यू युरोपमध्ये झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, जगभरात 16 लाख 99 हजार 632 लोकांना या साथीचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत, 1,02,737 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाविषयी एक खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या या तीन प्रकाराने आज संपूर्ण जगात कहर केला आहेत.

टाइप A
हा विषाणू पहिल्यांदा बॅटपासून पेंगोलिनसारख्या प्राण्यापर्यंत पसरला होता. यानंतर मीट मार्केटमधून हा विषाणू चीनमधील वुहान येथे पोहोचला आणि त्याने मानवाला संक्रमित केले. संशोधकांनी कोरोना विषाणूच्या या प्रजातीला ‘टाईप ए’ असे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू चीनमध्ये राहिल्यानंतर जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत पोहोचला.

टाइप B
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या विषाणूच्या बदललेल्या प्रकाराला टाइप बी असे नाव देण्यात आले आहे. यामुळे, चीनमध्ये हजारो लोक मरण पावले आहेत. टाईप बीनंतर तो युरोप, दक्षिण अमेरिका आणि कॅनडामध्येही पोहोचला.

टाइप C
सिंगापूर, इटली आणि हाँगकाँगमधील हजारो लोकांचा या संक्रमणामुळे जीव गेला आहे. त्याचे प्रारंभिक रुग्ण फ्रान्स, इटली, स्वीडन आणि इंग्लंडमध्ये आढळले. संशोधनानुसार हा विषाणू जर्मनीहून इटलीमध्ये आला आणि जर्मनीमध्ये हा सिंगापूरमधील लोकांद्वारे संक्रमित झाला.