Coronavirus Lockdown : तब्बल 25000 ‘बॅकस्टेज’ कामगारांना करणार मदत करणार ‘भाईजान’ सलमान खान

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे अनेकजण आपआपल्या पद्धतीने मदत करीत आहेत. अशातच आता लॉकडाउनमध्ये अभिनेता सलमान खान हा त्यांच्या संस्थेच्यावतीने तब्बल 25 हजार बॅक स्टेज कामगारांना रोजगार देणार आहे.

आतापर्यंत अभिनेता अक्षय कुमार याने 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय अनेक उद्योगपतीही पुढे आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांचे हाल होत आहे. लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे आता घर कसे चालवायचे असा मोठा प्रश्न कामगारांसमोर आ वासून उभा राहिला आहे. यात अभिनेता सलमान खान या कामगारांच्या मदतीला धावून आला आहे. तब्बल 25 हजार रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांना सलमान खान मदत करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग बंद झाल्यामुळे सेटवर काम करणारे, सफाई करणारे, स्वयंपाकाच काम करणार्‍या कामगारांच्या हाताला काम नाही. यापूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्लॉई संस्थेने कलाकार व निर्मात्यांना मदतीचे आवाहन केले आहे. सिनेष्टीतील या कामगारांचे हाल होऊ नये यासाठी सलमान खान संस्थेच्या संपर्कात आहेत. या संस्थेच्या मदतीने सलमानची टीम रोजंदारीवर काम करणार्‍या मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.