महाराष्ट्रातील 48 जागांचे कल : जाणून घ्या कोणता पक्ष आघाडीवर आणि कोण पिछाडीवर

पोलीसनामा : ऑनलाइन टीम – राज्यातील सर्वच 48 जागांचे कल हाती आले असुन त्यामध्ये भाजप-शिवसेना युती आघाडीवर आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पिछातीवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुंबईतील 6 जागांवर युतीचा बोलबाला पहावयास मिळत आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर येथुन धक्‍कादायक निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

मराठवाडयात भाजपला 2, शिवसेनाला 1, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवालीला 2 जागांवर कल मिळाला आहे.
विदर्भात भाजपला 5, शिवसेना 2, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 0 जागेवर कल मिळाला आहे.
कोणक-ठाणे विभागात भाजपला 1, शिवसेनेला 2, काँग्रेसला 0 तर राष्ट्रवादीला एका जागेवर कल मिळाला आहे.
मुंबईत भाजपला 3, शिवसेनेला 3 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 0 जागेवर कल मिळाला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला 5, शिवसेनेला 4, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादीला 4 जागेवर कल मिळाला आहे.
उत्‍तर महाराष्ट्र भाजपला 3, शिवसेनेला 1, काँग्रेसला 1, राष्ट्रवादीला 1 जागेवर कल मिळाला आहे.
बहुजन वंचित आघाडीला एका जागेवर कल मिळाला आहे.

महाराष्ट्र : एकुण 48 जागा
भाजप – 22
शिवसेना – 11
काँग्रेस – 5
राष्ट्रवादी – 9
वंचित बहुजन आघाडी – 1