Lok Sabha Election In Maharashtra | महायुतीत भाजपा तर मविआमध्ये ठाकरेच वरचढ, आतापर्यंत जाहीर केले अनुक्रमे २३ आणि २१ उमेदवार, वाचा संपूर्ण यादी

मुंबई : Lok Sabha Election In Maharashtra | लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे जागावाटप पूर्ण झाले असले तरी काही पक्षांना अद्याप उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत. पण, जास्तीत जास्त उमेदवार जाहीर करण्यात महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपा (BJP) तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ठाकरेंची शिवसेना (Shivsena UBT) वरचढ ठरली आहे. महायुतीत असलेल्या शिंदे गटाची (Shivsena Eknath Shinde) आवस्था तर याबाबतीत बिकट असल्याचे दिसते. शिंदे गटाला अद्याप श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उमेदवारी सुद्धा जाहीर करता आलेली नाही.

आता पर्यंत भाजपाने लोकसभेसाठी सर्वाधिक २३ तर ठाकरेंच्या शिवसेनेने २१ जागा जाहीर केल्या आहेत. या दोन पक्षांनी एकुण जागांपैकी अनुक्रमे युती, आघाडीतील जवळपास ५० टक्के उमेदवार दिले आहेत. आजच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा चार उमेदवार जाहीर केले आहेत. यापूर्वी शिवसेनेने १७ उमेदवार जाहीर केले होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघ – वैशाली दरेकर, पालघर लोकसभा मतदारसंघ – भारती कामडी, जळगाव – करण पवार, हातकंणगले – सत्यजित पाटील हे चार उमेदवार आज उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहेत. यापैकी वैशाली दरेकर या मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरूद्ध लढणार असल्याने सध्या त्या चर्चेत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ
३) संजोग वाघेरे-पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टीकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाई वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) संजय दिना पाटील-मुंबई-ईशान्य
१४) अरविंद सावंत-मुंबई-दक्षिण
१५) अमोल किर्तीकर-मुंबई-वायव्य
१६) अनिल देसाई-मुंबई, दक्षिण मध्य
१७) संजय जाधव-परभणी
१८) वैशाली दरेकर-कल्याण
१९)सत्यजीत पाटील-हातकणंगले
२०) करण पवार-जळगाव
२१) भारती कामडी-पालघर

आतापर्यंत जाहीर झालेले भाजपाचे उमेदवार

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड – पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
२१) सोलापूर – राम सातपुते
२२) भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
२३) गडचिरोली चिमूर – अशोक नेते

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक