Lok Sabha Election Survey | आज निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाला? महायुतीला फटका; मविआ जोमात, सर्व्हेचे आकडे धक्कादायक!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Survey) इंडिया आघाडी (India Alliance) की एनडीए बाजी मारणार, याबाबत एबीपी या हिंदी वृत्तवाहिनीने सी वोटरच्या माध्यमातून जनतेच्या मनातील कौल घेतला आहे. जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर यात कोणाचा विजय होईल आणि कुणाच्या पदरी निराशा येईल, याबाबत देशातील ५ राज्यातील आकडे हैराण करणारे आहेत. (Lok Sabha Election Survey)

पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या ५ राज्यात लोकसभेच्या एकूण २२३ जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते.

सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Survey) महाराष्ट्रात एकूण ४८ जागा असून येथे काँग्रेस (Congress)-शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पारडे जड असल्याचे दिसून येते आहे. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाला किती जागा मिळतील हे आकडे सर्व्हेनुसार पुढील प्रमाणे –

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांचा अंदाज

  • महायुती १९-२१ जागा
  • महाविकास आघाडीला २६-२८ जागा
  • इतरांना ०-२ जागा

मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असा सर्व्हेचा अंदाज आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Thackeray Group | कलंकित, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी न देण्याचे फर्मान सुटले तर शिंदे, अजित पवार गटातील…, शिवसेनेचा घणाघात

Pune Pimpri Chinchwad Crime News | मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण करुन चारचाकी गाडीची तोडफोड, नदीपात्रातील घटना

सिनेस्टाईल पाठलाग, अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात रोड रोमियोंकडून विनयभंग; वारजे माळवाडी परिसरातील घटना

पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

अंगावरील कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Ajit Pawar | आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी, अजित पवारांची माहिती