ओवेसींनी शपथ घेण्यास येताच ‘जय श्रीराम’चे नारे, त्यावर ओवेसी म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सतराव्या लोकसभेच्या पहिल्या पहिल्या अधिवेशनात सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.पहिल्या दिवशी ३१३ सदस्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर आज उर्वरित सदस्यांनी शपथ घेतली. काल अनेक खासदारांनी आपल्या मातृभाषेत शपथ घेतली होती. त्यात महाराष्ट्र्रातील सार्वधिक खासदारांचा समावेश होता. त्यानंतर आज सभागृहात एक विचित्र मिळाला. काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता भाजप खासदारांनी ‘मोदी…मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या होत्या.

त्यानंतर आज असाच प्रसंग एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी शपथविधीसाठी उभे राहिले असता भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावर ओवेसी यांनी काहीही प्रतिक्रिया न देता फक्त हातवारे आणखी बोला असे म्हणत खासदारांना डिवचले. त्यानंतर ओवेसी यांनी उर्दूतून शपथ घेतली.

भाजप खासदारांच्या जय श्रीराम या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून ओवेसींनी शपथ झाल्यानंतर ‘जय भीम…अल्‍लाह ओ अकबर.. हि घोषणा देत आपली शपथ संपवली. या गडबडीत ते सही करायला देखील विसरले. मात्र त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सही केली. ओवेसी यांच्याप्रमाणेच आज अनेक सदस्यांनी शपथ घेतली. काही कारणास्तव ज्यांना काल शपथ घेता आली नव्हती त्या सदस्यांनी आज शपथ घेतली.
दरम्यान, आज सभागृहात सुखबीर बादल, सनी देओल, भगवंत मान यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील आज शपथ घेतली.

सिनेजगत

अभिनेत्री कंगनासोबतच्या ‘किसिंग’ सीनला शाहिद कपूर म्हणाला ‘चिखल’, जाणून घ्या कारण

अभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांना मोठा ‘झटका’, कारण…

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी