मालेगाव बाॅम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा सिंह यांचा ‘तो’ खोटारडेपणा उघडकीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. परंतु आपण आजारी असल्याचे कारण पुढे करत तिने कोर्टात हजेरी लावणे टाळले. मात्र एका सार्वजनिक कार्यक्रमात घोषणाबाजी करताना आढळून आल्याने आता त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे, त्याचप्रमाणे त्यांनी केलेले आजारपणाचे नाटक देखील उघडकीस आले.

ईदच्या दिवशी देखील सार्वजनिक कार्यक्रमात त्या दिसल्या होत्या, मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी त्यांना कोर्टात हजार व्हायचे होते, त्या दिवशी त्यांनी आजारपणाचे नाटक केले. आणि दवाखान्यात भरती झाल्या. त्यामुळे नक्की त्या आजारी होत्या तर मग महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या दिवशी त्या सहभागी कशा काय झाल्या? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पत्रकारांनी त्यांना आजारपणाबाबत प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या कि उन्हामुळे कधी कधी असे होते. त्यामुळं त्या नाटकं करत होत्या कि खरंच आजारी होत्या हे कुणालाच कळू शकले नाही.

दरम्यान, २००९ पासून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना कोर्टाने मागील वर्षी सशर्त जमीन दिला होता. तसेच दर आठवड्याला हजेरी लावण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.