Lokmanya Tilak National Award | लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर, 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lokmanya Tilak National Award | यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे (Lokmanya Tilak Memorial Trust) विश्वस्त डॉ. रोहित टिळक (Trustee Dr. Rohit Tilak) यांनी ही घोषणा केली आहे.

 

पुरस्कार प्रदान सोहळा 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक (Dr. Deepak Tilak) यांच्याहस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचे रोहित टिळक यांनी सांगितलं. पण शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येऊ शकतात.

 

1983 पासून पुरस्काराची सुरुवात

दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) दिला जातो. टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

आत्तापर्यंत या मान्यवरांचा पुरस्कार प्रदान

1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. यापूर्वी एस.एम.
जोशी (SM Joshi), कॉम्रेड डांगे (Comrade Dange), इंदिरा गांधी (Indira Gandhi),
डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh), अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee),
प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee), राहुल कुमार बजाज (Rahul Kumar Bajaj),
जी. माधवन नायर (G. Madhavan Nair), एन.आर. नारायण मूर्ती (N.R. Narayana Murthy), डॉ. शिवथाणू पिल्ले (Dr. Sivathanu Pillai), माँटेकसिंग अहलुवालिया (Montek Singh Ahluwalia), डॉ. कोटा हरिनारायण (Dr. Kota Harinarayan), डॉ. कैलासावडिवू सिवन (Dr. Kailasavadivu Sivan), बाबा कल्याणी (Baba Kalyani), सोनम वांगचुक (Sonam Wangchuk), डॉ. सायरस पुनावाला (Dr. Cyrus Poonawalla) यांच्यासह अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

 

 

 

Web Title : Lokmanya Tilak National Award | 2023-year-lokmanya-tilak-national-award-was-announced-to-
prime-minister-narendra-modi-by-rohit-tilak

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sanjay Shirsat on Narhari Zirwal | ‘झिरवळांनी अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नये’, आमदारांच्या अपात्रतेच्या दाव्यावर संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर

Governor Nominated MLA | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर उद्या सुनावणी, स्थगिती राहणार की उठणार याकडे सर्वांचे लक्ष

Chhagan Bhujbal | मुंडे कुटुंब कोणी फोडलं? धनंजय मुंडेंना कुणी दूर केलं?, छगन भुजबळांचा रोहित पवारांवर पलटवार