Governor Nominated MLA | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर उद्या सुनावणी, स्थगिती राहणार की उठणार याकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Governor Nominated MLA | राज्यापाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणावर उद्या (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी (Hearing) होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांच्या पीठासमोर उद्या केस लिस्ट आहे. सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना ( Governor Nominated MLA) कोर्टात स्थगिती दिली आहे. त्यामुळे उद्या स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी न्यायमूर्ती जोसेफ (Justice Joseph) यांच्यासमोर ही केस सुरु होती. मात्र ते निवृत्त झाल्याने ही केस सरन्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आली आहे.

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या (Governor Nominated MLA) यादीचा घोळ मागील तीन वर्षांपासून सुरु आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Former Governor Bhagat Singh Koshyari) यांना 12 सदस्यांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र, या यादीला राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळाला नाही. तसेच यादी मंजूर करण्यातबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही. याप्रकरणी राज्य सरकारने (State Government) सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

यानंतर राज्यात घडलेलेल्या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आले. या सरकारने आधीच्या सरकारने दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवीन यादी राज्यपालांना सादर करण्याची तयारी सुरु केली. या 12 नावांसाठी दोन्हीकडून जोरदार लॉबिंग सुरु असल्याची चर्चा आहे. आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला (BJP) 12 पैकी 8 आणि शिंदे गटाला (Shinde Group) 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचीका दाखल करण्यात आली होती.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं म्हणत न्यायालयात
आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
आता यावर काय निर्णय होतो हे उद्या म्हणजेच मंगळवारी (दि.11) समजेल.

Web Title : Governor Nominated MLA | governer nominated mla mlc case hearing on 11 july eknath shinde vs mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Protest Against BJP Govt | काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन ! ‘भाजप’ वॉशिंग मशीन, ‘मोदी’ वाशिंग पावडर

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले…

Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

Uddhav Thackeray | ‘मर्दाची औलाद असाल तर या सरकारी यंत्रणा…’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान (व्हिडिओ)