Loksabha : नेत्यांसह कार्यकर्त्यांवरही आयकर विभागाची नजर

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयक विभागाला सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय नेते आणि कर्यकर्त्यांच्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर आयकर विभागाची नजर असणार आहे. सेल टॅक्स विभाग आणि एक्साईज विभाग यांच्या सोबत ही संयुक्त करावई होणार आहे. या विभागांनी संयुक्त कारवाई करुन रामटेक लोकसभेत ५० लाख तर बीडमध्ये १ कोटी ९० लाख रुपये आयकर विभागाने पकडले आहेत.

नेत्यांची खसगी चॉपर्स आणि विमानांवरही आयकर विभागाची नजर असणार आहे. बीड आणि रामटेक मतदारसंघात कारवाई केल्याचे आयकर विभागामार्फत सांगण्यात आले आहे. वाहनामधून रोकड नेताना कार्यकर्त्यांना पकडण्यात आले आहे. विदर्भासह २४ लोकसभा मतदारसंघावर नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. आयकर आयुक्तांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

एकूण २८ जणांचे पथक तैनात याठिकाणी तैनात करण्यात येत आहे. नोडल ऑफिसर आणि व्हेरिफिकेशन ऑफिसरची नियुक्तीही केली जाणार आहे. तसेच एअर सरविलन्स केले जाणार आहे. विमानतळावरही यंत्रणा सतर्क असणार असेही यावेळी सांगण्यात आले आहे. गोंदिया, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, नागपूर आणि नांदेड अशा एकूण सहा विमानतळांवर आयकर विभागाचे लक्ष असणार आहे. याबद्दल कोणाकडे अधिक माहिती असल्यास टोल फ्री नंबर 1800 233 3785 व्हॉट्सअॅप नंबर 9403391664, फॅक्स नंबर 07122525844 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.