खडसेंच्या रावेर मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष

रावेर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेना पक्षात युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर सेना-भाजपमध्ये रोज नवीन वाद समोर येत आहेत. याचाच प्रत्यय एकनाथ खडसेंचे कार्यक्षेत्र असलेल्या रावेर मतदारसंघात पाहण्यास मिळाला आहे. शिवसेनेला रावेर मतदारसंघ मिळावा म्हणून स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे सध्या चित्र आहे. शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या घरासमोरच या मतदारसंघाच्या मागणीसाठी शिवसैनिक ठिय्या आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या रावेर मतदारसंघाच्या खासदार आहेत. या ठिकाणी भाजपकडून शिवसैनिकांवर नेहमीच अन्याय होतो असा आरोप येथील शिवसैनिक करत असतात. अशा सर्व पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना भाजप यांच्यात युती झाली आहे. त्यामुळे सेना भाजपमधील स्थानिक पातळीवरील संघर्ष सातत्याने समोर येत आहे. तसाच संघर्ष रावेर येथील शिवसैनिक आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुरु झाल्याचे राजकीय परिस्थितीवरून दिसते आहे.

एकनाथ खडसे यांच्या परिवारातील व्यक्ती जर उमेदवार असेल तर शिवसैनिक भाजपचे काम करणार नाहीत असा पवित्रा येथील पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. भाजपने उमेदवार बदलावा अथवा हि जागा शिवसेनेला सोडावी असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, रावेर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याची तयारी सुरु केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like