गोपीनाथ मुंडेंच्या कन्येने ‘गड’ राखला ; बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे ‘एवढ्या’ मतांनी विजयी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड मतदार संघात डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपला गड राखला आहे. राजकीय पातळीवर प्रचंड संवेदनशील झालेल्या बीड मतदारसंघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे उमेदवार होते. मात्र खरी लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये होती. बीडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नेहमीच संघर्ष होत राहिला आहे. या लढतीत मुंडे यांनी १,६६,८८५ मतांनी विजयी झाले. भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना ६,७४,५५९ एवढी मते पडली. तर राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना ५,०७,८८५ एवढी मते मिळाली.

बीड लोकसभा मतदार संघात एकूण मतदार १८ लाख ८४ हजार ८६६ मतदार आहेत. आहेत. त्यापैकी एकूण १३ लाख ४८ हजार ४७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ६६. ०६ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४ च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली होती.

कायम दुष्काळी अशी ओळख असलेला हा बीड जिल्हा नेहमीच राजकीय हेवेदाव्यांनी चर्चेत असतो. बीड मतदार संघात एकून ११ तालुके असून ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी या विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे तर बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सध्या राष्ट्रवादीचा एक तर इतर पाच भाजपचे आमदार आहेत. कधीकाळी इथे सर्वाधिक राष्ट्रवादीचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना ९ लाख २२ हजार ४१६ मतं मिळाली. त्या ६ लाख ९६ हजार ३२१ मताधिक्य मिळवून निवडून आल्या होत्या .

———————————————————————————————————-
बीड मतदार संघ
———————————————————————————————————-

एकूण मतदार – १८ , ८४ , ८६६

एकूण मतदान – ६६. ०६ %

विजयी उमेदवार – डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)

मिळालेली मते – ६,७४,५५९