प्रकाश आंबेडकर विजयापासून ‘वंचित’ ; अकोल्यात संजय धोत्रे विजयी

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे आणि कॉंग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांच्या तिरंगी लढत झाली. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूरमधून निवडणूक लढविली. दरम्यान अकोल्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सोलापूरातही ते पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे उमेदवार संजय धोत्रे हे विजयी झाले आहेत.

अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी दिली. तर कॉंग्रेसक़डून हिदायतुल्ला पटेल आणि भाजपकडून संजय धोत्रे यांची उमेदवारी होती. या तिघांमध्येच लढत रंगली. अकोल्यात पहिल्या फेरीपासूनच संजय धोत्रे आघाडीवर होते.

प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूरातूनही निवडणूक लढविली आहे. या तिरंगी लढतीत प्रत्येकाने आपणच निवडून येण्याचा कॉन्फिडन्स दाखवला. परंतु मतदारांनी हा कौल दिला.

विजयी उमेदवार – संजय धोत्रे

पराभूत – प्रकाश आंबेडकर, हिदायतुल्ला पटेल

एकूण उमेदवार –११

धात्रे संजय शामराव (भाजप) – ४,६३,७५५

आंबेडकर प्रकाश यशवंत (वंचित बहुजन आघाडी) – २३७७३३

हिदायत पटेल (कॉंग्रेस) – २१८३०४

अकोला मतदारसंघातील एकूण मतदार – १८ लाख १७ हजार ७३९

पुरुष मतदार – ९ लाख ६४ हजार ३११

महिला मतदार – ८ लाख ९७ हजार ३८०

अकोला मतदारसंघामध्ये झालेले मतदान – ११ लाख १६ हजार ७६३