निवडून आलेल्यांपैकी शिवसेनेचे ‘हे’ खासदार होऊ शकतात केंद्रात ‘मंत्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप शिवसेना युतीने राज्यात अभूतपुर्व विजय मिळवला आहे. त्यात शिवसेनेला आपल्या १८ जागांवर यश मिळाले आहे. तर ४ ज्येष्ठ नेत्यांना पराभूत व्हावं लागलं. सत्ता स्थापनेवेळी एनडीएच्या घटकपक्षांसोबत शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. त्यात विनायक राऊत, गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, राजन विचारे, राजेंद्र गावित, भावना पुंडलिकराव गवळी ही नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

लोकसभा निवडणूकीत भाजप शिवसेना युती झाली. त्यानंतर शिवसेनेने लढविलेल्या जागांपैकी १८ जागा राखता आल्या. शिवसेना भाजप युतीने राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीला धूळ चारली. त्यात शिवसेनेसोबत युती असल्याने शिवसेनेला केंद्रात २०१४ प्रमाणे मंत्रीपद मिळणार आहे. मात्र शिवसेनेकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले ४ उमेदवार पराभूत झाले. चंद्रकांत खैरे, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आनंदराव अडसूळ, नरेंद्र पाटील, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात मंत्रीपदासाठी चुरस होती. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर आता निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ६ ते ७ खासदार हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. विजयी झालेल्या विनायक राऊत, गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, राजन विचारे, राजेंद्र गावित, भावना पुंडलिकराव गवळी यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विजयी उमेदवार

प्रताप जाधव, भावना पुंडलिकराव गवळी, हेमंत पाटील, संजय उर्फ बंडू जाधव, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, श्रीकांत एकनाथराव शिंदे, राजन विचारे, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, प्रा. संजय मंडलिक, धर्यशील माने

पराभूत

चंद्रकांत खैरे, अनंत गिते, आनंदराव अडसूळ, नरेंद्र पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील