Loni Kalbhor Pune Crime | पुणे : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Loni Kalbhor Pune Crime | दहावीत शिकणाऱ्या तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिला त्रास दिला. रोडरोमिओकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने पिकावर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या (Attempt To Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत घडली आहे. याबाबत रोडरोमियोवर गुन्हा दाखल करुन अटक कऱण्यात आली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.12) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. आरोपी पीडित तरुणीला मागील सहा महिन्यापासून त्रास देत आहे.

याबाबत पीडित 16 वर्षाच्या मुलीने शनिवारी (दि.13) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रणव सुर्वे (वय-21 रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 354(अ), 354(ड), 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Loni Kalbhor Pune Crime)

सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी दहावी मध्ये शिकत आहे. ती बसने शाळेत जात असताना आरोपी प्रणव सुर्वे याने तिचा दुचाकीवरुन पाठलाग करत होता. आरोपी मागील सहा महिन्यापासून मुलीचा पाठलाग करुन तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच अश्लील हावभाव करुन तिला त्रास देत होता.

मागील तीन दिवसांपूर्वी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलगी शेतात जात असताना आरोपीने तिला रस्त्यात आडवले.
तिला सोबत येण्यास सांगून, सोबत आली नाही तर तुझा जीव घेईन अशी धमकी दिली.
आरोपीकडून होत असलेल्या त्रासामुळे पीडित मुलगी तणावात होती.
शुक्रवारी सकाळी घरात कोणी नसताना मुलीने तणावात येऊन पिकावर मारण्याचे राऊंडअप औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्रास होऊ लागल्याने घरच्यांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवीण सुर्वे याच्यावर पोक्सो अॅक्ट (POCSO Act)
नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास एपीआय शिवशांत खोसे करीत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त