चारचाकी वाहनातील बॅटऱ्या चोरी करणारा लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – वाहनतळावर असलेल्या चारचाकी गाड्यांच्या बॅटऱ्या चोरी जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने लोणीकंद पोलिसांनी विशेष मोहीम राबवल्यावर एका इसमासह दोन अल्पवयीन ताब्यात घेतले आहेत.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवेंद्र अशोककुमार सिंह वय ३४ वर्षे, रा. कटकेवाडी, वाघोली, पुणे हे काम करीत असलेल्या पेपकार्ट प्रा. लि. कटकेवाडी, वाघोली, पुणे येथील वेअर हाऊस चे पार्किंग मधून पार्किंग केलेल्या चारचाकी गाड्यांच्या बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पळवल्याचा गुन्हा फेब्रुवारी महिन्यात दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा गुन्हे शोध पथक तपास करीत होते.

रात्रीच्या वेळी बॅटऱ्या चोरीचे प्रकार वाढत असल्याने अश्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या.हे शोध पथक वाघोली गावचे हद्दीत गस्त घालत असताना कटके वाडी फाटा येथे तीन इसम रिक्षा क्रमांक एम एच १२ क्यू आर २३५६ मध्ये विना मास्क बसलेले असताना दिसले. पथकातील कर्मचारी त्यांच्याकडे जात असताना रिक्षाचे चालकसीट वर बसलेला इसम विठ्ठलवाडी कमानीचे बाजूने पळून गेला म्हणून पथकास त्यांचा संशय आल्याने इतर दोन इसमांना जागीच पकडुन नाव पत्ता विचारता तसेच त्यांच्याकडील ओळखपत्राची पाहणी केली ते दोघेही विधी संघर्षीत बालके होती. तसेच त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे मदतीने पळून गेलेला इसम रेहान अन्वर सय्यद वय २४ रा. घर नंबर ५, खडकी बाजार, शॉ ले टॉवर्स, दुसरा मजला, खडकी, पुणे यास पी. एम. टी. बस स्टॉप, वाघोली येथून सापळा रचून ताब्यात घेतले.

यातील विधी संघर्षीत बालकांना बाल न्याय मंडळ, येरवडा पुणे यांचे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, लोखंडी कटावणी, लोखंडी पक्कड, बॅटरी काढण्यासाठी लागणारा लोखंडी रॉड, तसेच गुन्ह्यांतील एकूण ८ बॅटऱ्या असा एकूण १,६५,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी साई भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी लोणीकंद गुन्हे शोध पथक – सहा. पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, विकास कुंभार, श्रीमंत होनमाने, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सागर कडू, बाळा तनपुरे, होमगार्ड दुबळे, होमगार्ड अडागळे, चव्हाण यांनी केली आहे.