पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर ढेपाळला ‘लव्ह आजकल’, ‘कमाई’ झाली ‘इतक्या’ कोटींची

नवी दिल्ली : पोलीसनामा वृत्तसंस्था – ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाला अत्यंत खराब रिव्हयू मिळत असून दिवसेंदिवस त्यांची बॉक्स ऑफिसवरील कमाई कमी होताना दिसून येत आहे. पहिल्या दिवशी १२. ४ करोड ची कमाई झाली असून दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा कमाई कमी झालेली दिसत आहे.
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाची चर्चा प्रदर्शित होण्याआधी भरपूर झाली, पण आता या चित्रपटाला कोणी फारसे मनावर घेतलेले नाही. हा चित्रपट मॉडर्न आणि ९० च्या दशकातील प्रेम कहाणीवर आधारित आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या पिक्चरची चाहत्यांनी खूप वाट पाहली पण, नंतर चाहते नाखूष झालेले दिसून येत आहे.

चांगलाच तोंडावर आपटला ‘ लव्ह आज कल ‘

दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवरील कमाई घटत असून पहिल्या दिवशी १२.४ करोड तर दुसऱ्या दिवशीची कमाई ८. ०१ करोड इतकीच झाली आहे. या पिक्चरने रविवारी सुद्धा काही खास कमाल केली नाही. रविवारी फक्त ८. १० करोड एवढेच कलेक्शन झाले आहे. या चित्रपटाची एकूण कमाई २८.५१ करोड इतकी आहे . मह्रत्वाची बातमी अशी आहे की २००९ मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी केलेल्या लव्ह आज कल या चित्रपटाचे पहिल्याच आठवड्यातील कलेक्शन हे २८. ५ करोड इतके होते.

इम्तियाज अली प्रदर्शित या चित्रपटात साराअली खान आणि कार्तिक आर्यन यांचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. रिव्यू बघितले तर या दोघांची ऍक्टिंग पूर्णपणे खराब होती. हा चित्रपट २००९ मधल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या लव्ह आज कल या पिक्चरचा हा रिमेक आहे.
या चित्रपटात कार्तिक सोबत रणदीप हुड्डा आणि आरुषी शर्मा ने काम केले आहे असून आता या चित्रपटाचे भाग्य बॉक्स ऑफिसवर सावरते की अजून बिघडते हे आता बघण्यासारखे असेल.

You might also like