Love affair | ‘कोविड’च्या काळात सोशल मीडियावरून मुला-मुलींचं ‘सूत’ जुळण्यात वाढ, महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून 69 पोरींनी बॉयफ्रेन्डसाठी घर सोडलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थांच्या हातात स्मार्ट फोन (Smart phone) आला आहे. या स्मार्टफोनचा काहीनी चांगला वापर केला, तर काहींनी त्याचा दुरुपयोग केला. सतत मोबाईलच्या वापरामुळे व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडियाचा (social media) वापर वाढला. यामुळे अनेकांची नवीन व्यक्तींसोबत ओळख झाली. त्यातून अनेकांची प्रेमप्रकरण (Love affair) सुरु झाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

काहींनी तर सोशल मीडियावर मिळालेल्या प्रेमाखातर आपलं घरही सोडलं आहे. एकट्या नाशिक शहरातून कोरोना काळात तब्बल 69 मुलींनी प्रियकर किंवा इतर विविध भूलथांपाना बळी पडत घरातून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 18 वर्षांखालील मुलींचा जास्तीत जास्त समावेश आहे. या वाढत्या प्रकारामुळे मात्र पालकवर्ग काळजीने ग्रासला आहे.

ram mandir ayodhya | घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांना कोर्टात खेचणार राम मंदिर ट्रस्ट, निशाण्यावर प्रियंका गांधी आणि संजय सिंह

पळून गेलेल्या मुलीपैकी 54 मुलींची समजूत घालून पुन्हा त्याच्या घरी पाठवण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. यात गेल्यावर्षी 37 तर यावर्षी 17 मुलींना पोलिसांनी घरी पाठवले आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार प्राप्त झालेली ही आकडेवारी आहे. मात्र समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तक्रार न देता शोधत राहणारे अनेक पालक असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Sharad Pawar | ‘महाविकास’ सरकार 5 वर्षे टिकणार, तिन्ही पक्षात मतभेद नाहीत’

लॉकडाऊनमुळे अनेकांना बराच रिकामा वेळ मिळाला. या रिकाम्या वेळेत मोबाईलचा मोठा वापर
वाढला. त्यामुळे घरातील मुलांसोबतचा संवाद तुटत आहे. त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू हे
घरच्यांनाही कळत नाही. त्यामुळे घरातील पौगंडावस्थेतील मुलं मुली सोशल मीडियाकडे जास्तीत
जास्त आकर्षित होतं आहेत. यातूनचं अशाप्रकारची प्रकरण घडत असल्याचे समोर आले आहे.

Family Pension | मोदी सरकारने दिला मोठा दिलासा ! पेन्शनरच्या मृत्यूनंतर आता कुटुंबाला पेन्शन मिळवण्यास येणार नाही अडचण, बँकांना दिले ‘हे’ निर्देश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Love affair | love affairs increased on social media during covid period in nashik city 69 girls leave home for boyfriend

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update