चंद्रपूरात रेल्वेखाली उडी मारून प्रेमीयुगलाची आत्महत्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन

अल्पवयीन प्रेमी युगलाने जिल्ह्यातील माजरी परिसरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले.

[amazon_link asins=’B01LWJ2J8G,B01JIRKTPQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16fab037-b975-11e8-89e7-13a0b4d7f61e’]

आत्महत्या केलेली मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील आहे तर मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. या दोघांचेही अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरच्यांचा आंतरजातीय विवाहाला विरोध होता. यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेऊन रेल्वेगाडीखाली झोकून आत्महत्या केली.

शिक्षकाकडून पाच वर्षात दाम दुप्पटच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक