नवी दिल्ली : LPG | घरगुती गॅस सिलेंडर (LPG) बुक करणे आणखी सोपे झाले आहे. आता ग्राहक आपल्या मनाप्रमाणे डिस्ट्रिब्युटर निवडू शकतात. एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगसाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) ने एक सुविधा सुरू केली आहे. ही व्यवस्था रिफिल पोर्टेबिलिटीबाबत आहे. सिलेंडर बुकिंगच्या वेळी ग्राहक पोर्टेबिलिटीची सुविधा घेऊ शकतात. यासाठी इंडियन ऑईलने एक मोबाइल अॅप बनवले आहे. या अॅपचे नाव ‘वन अॅप’ (one app) आहे.
मनाप्रमाणे डिस्ट्रिब्युटर निवडण्यासाठी वन अॅपशिवाय इंडियन ऑईलची वेबसाइट http://cx.indianoil.in वर सुद्धा व्हिजिट करू शकता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ग्राहक आपल्याला हव्या त्या रिफिल डिस्ट्रिब्युटरची निवड करू शकतात.
हे अॅप किंवा वेबसाइटवर ग्राहकाच्या परिसरात असलेल्या डिस्ट्रिब्यूटरची पूर्ण माहिती मिळेल. ग्राहक जेव्हा-जेव्हा रिफिल बुक करेल, त्यास डिस्ट्रिब्युटर निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. बुकिंगच्या वेळीच ग्राहक ड्रिस्ट्रिब्युटरची सुद्धा निवड करू शकतो, ज्यानंतर एलपीजी सिलेंडरची बुकिंग होईल.
Rajesh Tope | महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले…
कसे होईल बुकिंग
यासाठी ग्राहकांना मोबाइल अॅप किंवा आयओसीच्या पोर्टलवर जावे लागेल. यावर लॉगिन झाल्यानंतर डिलिव्हरी डिस्ट्रिब्युटरची एक लिस्ट दिसेल. डिस्ट्रिब्युटरचे परफॉर्मंन्स रेटिंगसुद्धा दिसेल ज्या आधारावर समजेल की त्याची सर्व्हिस किती चांगली आहे.
‘उमंग’वरून सुद्धा बुक करू शकता सिलेंडर
रिफिल बुकिंगचे काम उमंग अॅपवरून सुद्धा करता येऊ शकते.
हे सरकारी अॅप आहे ज्यावर एकाचवेळी अनेक सुविधा मिळतात.
ग्राहक आपल्या रिजस्टर्ड लॉगिनवरून आपल्या गॅस कंपनीचे (OMC) डिस्ट्रिब्यूटर निवडू शकतात.
हे लक्षात ठेवावे लागेल की, इण्डेन ग्राहक आपल्या परिसरातील इण्डेन डिस्ट्रिब्युटरकडूनच सिलेंडर मागवू शकतात.
मोबाइलप्रमाणे एलजीपीचे सुद्धा पोर्टिंग
पोर्टेबिलिटीच्या बाबतीत सोर्स डिस्ट्रिब्यूटर (ज्या एजन्सीकडून एलपीजी कनेक्शन घेतले आहे) आपल्या ग्राहकाला समजावू शकतात की त्यांच्याकडून सिलेंडर घ्यावा. पण हे ग्राहकावर अवलंबून आहे.
ते ग्राहकावर दबाव आणू शकत नाहीत.
सोर्स कंपनी ग्राहकाला पोर्ट कॅन्सल करण्यासाठी विनंती करते. आता ग्राहकावर अवलंबून आहे की, तो पोर्ट
कॅन्सल करतो किंवा एखाद्या दुसर्या कंपनीत जातो. हाच नियम रिफिल बुकिंगमध्ये सुद्धा लागू केला आहे.
एलपीजी ग्राहकाची इच्छा असेल तर 3 दिवसाच्या आत पोर्टेबिलिटी कॅन्सल करू शकतो. 3 दिवसानंतर एलपीजीचे कनेक्शन पोर्टवाल्या डिस्ट्रिब्यूटरकडे जाईल.