तुम्हाला माहिती आहे का ?  LPG च्या ग्राहकांना मिळतो ‘एवढ्या’ लाखांपर्यंतचा विमा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-आज भारतातील जास्तीत जास्त घरांमध्ये  स्वयंपाकाकरिता इंधन म्हणून LPG वापरला जातो. कुणाकडे भारत गॅस तर कुणाकडे इंडियन गॅस असतो पण तुम्हाला माहिती आहे का स्वयंपाकाच्या गॅस करिता तुम्हाला  तब्बल ५०  रुपयांपर्यंतचे  विमा कवच मिळते. विशेष बाब अशी की गेल्या २५ वर्षात  LPG विम्याकरिता एकही क्लेम केला गेलेला नाही.

LPG विमा सरंक्षण
LPG विमा एक दुर्घटनेसाठी मिळणारा  विमा आहे.  या विम्याकरिता कोणतेही वेगळे चार्जेस द्यावे लागत नाहीत ,कारण हा विमा पब्लिक लायबिलिटी पॉलिसीच्या आंतर्गत येतो. अशात LPG कंपन्या यूनाइटेड इंश्योंरेंस कंपनी लिमिटेडद्वारे आपल्या ग्राहकांना विमा संरक्षण देते. जर कुणाच्या घरी सस्वयंपाकाच्या सिलेंडरचा स्फोट झाला तर नियमानुसार कंपनीकडून विमा मिळतो.  LPG सिलेंडर मध्ये ब्लास्ट होण्याची देखील वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणानुसार विम्याची रक्कम दुर्घटनाग्रस्तांना मिळते.

एका मिळालेल्या अहवालानुसार ,मागील २५ वर्षात एकही क्लेम LPG विम्याच्या आंतर्गत दाखल झालेला नाही . LPG सिलेंडर मुळे झालेल्या स्फोटात जास्तीत जास्त ५० लाख रुपयापर्यंतचा विमा मिळतो. जर काही कारणास्तव  LPG  सिलेंडरच्या स्फोटात कुणाचा मृत्यू झाला तर ५ लाख रुपये मिळतात. जर कोणती व्यक्ती जखमी झाली असेल तर त्याच्या उपचाराकरिता जास्तीत जास्त १५ लाख रुपये मिळतात. दुर्घटना झाल्यावर गॅस कंपन्या तात्काळ २५ हजार रुपये देतात. जर गॅस च्या स्फोटामध्ये संपत्तीचे नुकसान झाले तर नुकसान झालेल्या प्रॉपर्टी नुसार १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. ही रक्कम गॅस कंपन्यांकडून दिली जाते.

क्लेम कसा करावा 

— सर्वात आधी गॅस स्फोटाच्या दुर्घटनेची माहिती पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा.
–त्यानंतर गॅस डिस्ट्रीब्यूटर ला याची माहिती द्या.
–पोलिसात नोंद केल्या घटनेची कॉपी तुमच्या गॅस डिस्ट्रीब्यूटर ला द्या.
–डिस्ट्रीब्यूटर  माहिती कंपनीला देईल.
–आता कंपनीचे कर्माचारी घटनास्थळाची पाहणी करतील
–झालेल्या नुकसानानुसार कंपनी विम्याची रक्कम ठरवेल.
–कुणाचा मृत्यू या घटनेत झाला असेल तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र ,पोस्ट मॉर्टम सर्टिफिकेट देणे अनिवार्य असते.
–आणि जखमींवर उपचार करीत असल्यास मेडिकल बिल आणि औषधाचे बिल देणे अनिवार्य असते.
–त्यानंतर जी बिलाची रक्कम असेल ती रक्कम कंपनी कडून दिली जाते.