LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – LPG Subsidy | एलपीजीवर सबसिडी मिळवणार्‍या ग्राहकांसाठी आवश्यक बातमी आहे. उज्ज्वला स्कीम (Ujjwala scheme) अंतर्गत फ्री LPG गॅस कनेक्शन (free LPG connection) वर मिळणार्‍या सबसिडीमध्ये मोठा बदल होऊ शकतो. यासाठी जर तुम्ही उज्ज्वला स्कीम अंतर्गत फ्री LPG कनेक्शन (LPG Subsidy) घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा.

एलपीजी कनेक्शनवर बदलणार सबसिडी स्ट्रक्चर?

रिपोर्टनुसार, नवीन कनेक्शनसाठी सबसिडीच्या (LPG Subsidy) सध्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने दोन नवीन स्ट्रक्चरवर काम सुरू केल्याचे वृत्त आहे आणि ते लवकरच जारी केले जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (finance minister nirmala sitharaman) यांनी बजेटमध्ये एक कोटी नवीन कनेक्शन देण्याची घोषणा केली होती, परंतु आता सरकार OMCs कडून अ‍ॅडव्हान्स पेमेंट मॉडलमध्ये बदल करू शकते.

अ‍ॅडव्हान्स पेमेंटची पद्धत बदलणार?

‘मनी कंट्रोल’ला सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, 1600 रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट कंपनी एकरकमी वसूल करेल. सध्या OMCs अ‍ॅडव्हान्स रक्कम EMI च्या स्वरूपात वसूल करते. सूत्रांनुसार, योजनेत बाकी 1600 ची सबसिडी सरकार देत राहील.

सरकार देते सरकार फ्री एलपीजी सिलेंडर

सरकारच्या Ujjwala scheme मध्ये ग्राहकांना 14.2 किलोचा सिलेंडर आणि स्टोव्ह दिला जातो. याचा खर्च सुमारे 3200 रुपये येतो,
परंतु यावर सरकारकडून 1600 रुपये सबसिडी (LPG Subsidy) मिळते तर 1600 रुपये तेल मार्केटिंग कंपन्या अ‍ॅडव्हान्सच्या रूपात देतात.
मात्र, OMCs रिफिल केल्यानंत सबसिडीची रक्कम ईएमआयच्या रूपात वसूल करतात.

Web Title :- lpg subsidy news new rule for subsidy may be announced for free lpg connection know here detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sitaram Kunte | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ वाढवला

PMC Bank चे USFB मध्ये होणार विलीनीकरण, ‘पीएमसी’च्या ग्राहकांना 10 वर्षात मिळणार पूर्ण पैसे

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 768 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ !
राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ