Coronavirus : गायिका कनिका कपूर ‘गोत्यात’, ‘प्रोटोकॉल’ तोडल्याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी केली FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – सिंगर कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर तिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. प्रोटोकॉल तोडल्याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी कनिकाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. असं सांगितलं जात आहे की, लखनऊ जिल्हा मजिस्ट्रेटनं आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. असं सांगितलं जात आहे की, तिला अटक होण्याची शक्यता आहे.

लंडनहून परत आल्यानंतर कनिकानं लोकांशी सतत लोकांशी संपर्क साधला होता. यावेळी तिनं काही पार्ट्याही अटेंड केल्या होत्या. या पार्टीत अनेक मोठी लोकं होती. यात केंद्रीय व राज्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंह हेही उपस्थित होते.

आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं होतं कारवाई होणार

युपीचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांनी आधीच सांगितलं होतं की, “कनिका कूपरनं परदेशातून आल्यानंतर प्रोटोकॉल तोडला आहे. ती कोणालाही काहीही न सांगता अनेक ठिकाणी फरली. आरोग्य विभागाच्या सचिवांनी कनिकविरोधात कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत.” असं ते म्हणाले होते.

3 किलोमीटरपर्यंतचा प्रभाग रिकामा केला

कनिका कपूरचं प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांनी आदेश दिला आहे की, कनिका कपूरच्या घरापासून 3 किलोमीटरचा प्रभाग रिकामा करण्यात यावा. यानंतर विकास नगर, खुर्रमनगर आणि अलीगंज येथील काही भाग रिकामा करण्यात आला.