माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त छायाचित्रकार हडकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त छायाचित्रकार मधुसुदन रामचंद्र हडकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. शासकीय छायाचित्रकार म्हणून त्यांनी मंत्रालय, मुंबई आणि पुणे विभागीय माहिती कार्यालयात ३० वर्षे सेवा केली. विविध महत्त्वाचे शासकीय समारंभ आपत्कालीन स्थिती अशा अनेक घटनांचे त्यांनी छायाचित्रण केले.

त्यांच्या पश्चात महसूल विभागातील निवृत्त ज्येष्ठ लघुलेखिका नंदा हडकर, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

You might also like