‘या’ सरकारकडून ‘पेंशनर्स’ना मोठं ‘गिफ्ट’ ! 12 % महागाई भत्ता, महाराष्ट्रामध्ये कधी मिळणार ?

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍यांना (पेंशनर्स) कमलनाथ सरकारने मोठी संधी दिली आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता वाढून आता १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील ४ लाख ६७ हजार पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. महागाई भत्त्यात १ जानेवारी २०१८ पासून ३ टक्के आणि १ जुलै २०१८ पासून ६ टक्के वाढ करण्यात आली आहे.

कमलनाथ सरकार राज्यातील सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍यांना १२ टक्के महागाई भत्ता देणार आहे. वाढीव भत्ता १ जानेवारी २०१९ पासून देण्यात येईल. सरकारने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार सातव्या तसेच सहाव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०१९ पासून निवृत्तीवेतनधारकांना १२ टक्के दराने महागाई सवलत मिळेल. त्याचबरोबर सहाव्या वेतनश्रेणीत ते १५ टक्के असेल. महागाई सवलतीत वाढ करण्याचा दर सहाव्या वेतनश्रेनीतील कर्मचाऱ्यांना ६ टक्के आणि सातव्या वेतनश्रेनीतील कर्मचाऱ्यांसाठी ३ टक्के असेल.

मिळालेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांच्या DA चा विषय जानेवारी २०१८ पासून प्रलंबित होता. पेन्शनर्सचा डीए वाढविल्यानंतर राज्य सरकारला दरवर्षी सुमारे दोनशे पन्नास दशलक्षचा भार सहन करावा लागणार आहे. सरकारने यापूर्वी सरकारी कर्मचार्‍यांना 9% डीए देण्याची घोषणा केली होती.

राज्य सरकारने पेन्शनर्स आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या सहाव्या वेतनश्रेणीच्या डीएमध्येही वाढ केली आहे. १ जानेवारी २०१८ पासून डीएमध्ये ३ टक्के आणि १ जुलै २०१८ पासून ६ टक्के वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, मध्यप्रदेश सरकारनं १२ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केल्यामुळं महाराष्ट्रातील पेंशनर्स देखील त्याबाबत चर्चा करीत आहेत. मध्यप्रदेशात काँग्रेसचं सरकार असताना देखील तेथील पेंशनर्सना महागाई भत्ता म्हणून १२ टक्के मिळतात आणि महाराष्ट्रात तर भाजप सरकार आहे. त्यामुळं महागाई भत्त्याबाबत सध्या राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
आरोग्यविषयक वृत्त –