Video : मारहाण प्रकरणी भाजप आमदाराला ‘जामीन’ मिळाल्याने समर्थकांकडून ‘गोळीबार’

भोपाळ : वृत्तसंस्था – महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगात असलेले आमदार आकाश विजय वर्गीय यांना जामीन मिळाल्याच्या आनंदात भाजपाच्या समर्थकांनी हवेत फायरिंग करुन आणखी एक गुन्हा केला आहे.

भोपाळच्या विशेष न्यायालयाने आकाश विजय वर्गीय यांना शनिवारी जामीन मंजूर केला. मात्र, जामिनाची कागदपत्रे वेळेवर तुरंगात न पोहचल्यामुळे त्यांना सलग चौथ्या दिवशी शनिवारची रात्र तुरुंगात काढावी लागली.

आज रविवारी सकाळी १० वाजता त्यांना तुरुंगातून सोडण्यात येणार आहे. आकाश विजय वर्गीय यांना जामीन मिळाल्यानंतर भाजपाच्या कार्यालयाबाहेर शनिवारी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ढोलाच्या तालावर नाच करताना काही जण दिसत असून काही समर्थकांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे. त्यांच्यातील एक जण स्कुटरवर बसला असून त्याने हातातील बंदुकीतून एक, दोन नव्हे तर चक्क पाच वेळा हवेत फायरिंग केल्याचे दिसून येत आहे.

आकाश विजय वर्गीय याने महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. आकाश भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजय वर्गीय यांचे पुत्र आहेत.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा
‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा
‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर
अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा