हनी ट्रॅप : खुपच अवघड होतो ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या महिलांना पकडनं, बदलत होती ‘लोकेशन’

नवी दिल्ली वृत्तसंस्था – मध्यप्रदेश मधील दिन मुलींना पोलिसांनी हनीट्रॅप साथीच्या आरोपावरून ताब्यात घेतले होते हा राजकीय वर्तुळातील मोठा भूकंप मानला जात आहे. कारण मुलींच्या चौकशी नंतर धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

हनीट्रॅप मधील मध्ये पकडलेल्या या मुलींची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली यावेळी या मुली खूपच शातीर आणि आपले काम साधून घेण्याबाबत पटाईत असल्याचे समोर आले.

चौकशीमध्ये या महिलांनी सांगितले आहे की, यांनी फसवलेला व्यक्ती आतापर्यंत यांना पकडू शकलेला नाही कारण मोठा हात मारल्यावर या मुली आपले घर बदलत होत्या आणि नवीन एखाद्या पॉश परिसरात या नवीन घर घेत असत.

यातील एका श्वेता जैन नावाच्या मुलीला पोलिसांनी भोपाळच्या एका सगळ्या आलीशान आणि पॉश परिसरातून अटक केली होती. तिने नुकतेच आपले घर बदलले होते या आधी ती माजी मंत्री आणि बीजेपीचे आमदार बुजेंद्र प्रताप सिह यांच्या घरात भाड्याने राहत होती. यासाठी ती दरमहिन्याला ३५ हजार भाडे देत होती.

बुजेंद्र प्रताप यांनी सांगितले की, त्यांनी ब्रोकरच्या माध्यमातून त्या मुलीला आपले घर भाड्याने दिले होते. तसेच या आधी त्या घरात जैन परिवाराचं राहत असल्याने त्यांनी ब्रोकर मार्फत आलेल्या व्यक्तीची जास्त चौकशी केली नाही.

इंदौरमध्ये पकडलेली आरती नामक मुलगी या आधी छतरपूर जिल्ह्याची राहणारी आहे आणि त्या ठिकाणाहून एकाला फसवून ती भोपाळमध्ये आली आणि तिथेच घर पाहून राहू लागली. भोपाळ हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे आरतीचे अनेक मोठं मोठ्या नेत्यांसोबत आणि उद्योजकांसोबत उठणे बसने होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अनेक महत्वाचे धागेदोरे हाती लागणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

नगर निकममधील एका कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल केल्यानंतर आरती दयाल आणि मोनिका यादव याना पोलिसांनी अटक केली होती. चौकशी दरम्यान यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रिवेरा टाऊनमधून श्वेता जैन हिला अटक केली होती.

visit: Policenama.com