Madras High court | ऑफिसमध्ये खासगी कामासाठी मोबाईल वापरल्यास जाऊ शकते नोकरी, हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Madras High court | सरकारी कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामासाठी मोबाईल फोन वापरू नये, असे तामिळनाडूतील (Tamilnadu) न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने तामिळनाडू सरकार (Tamilnadu Govt) ला याबाबत नियमावली (Regulations) बनवण्यास सांगितले आहे. (Madras High court)

 

हे प्रकरण मदुराईचे आहे. येथील मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) खंडपीठाने एका सरकारी कर्मचार्‍याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. आरोग्य विभागातील एका महिला कर्मचार्‍याने ही याचिका दाखल केली होती. कार्यालयीन कामकाजादरम्यान ही महिला कर्मचारी मोबाईल वापरताना आढळून आली होती. (No Use Of Mobile Phone During Office Hours)

 

त्यामुळे विभागाने तिला निलंबित केले होते.
त्याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल करून तिच्या निलंबनाचा आदेश रद्द करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, अशी मागणी केली होती.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमण्यम (Justice S.M. Subramaniam) यांनी या प्रकरणाच्या तपशिलात जाण्यास नकार दिला.
ते म्हणाले की, आजकाल सरकारी कर्मचारी कार्यालयीन कामकाजादरम्यान वैयक्तिक कामासाठी मोबाईल फोन वापरतात हे सर्वसामान्य झाले आहे.

 

ही चांगली प्रथा नाही. किमान सरकारी कर्मचार्‍यांना तरी याची परवानगी देऊ नये.
यासोबतच याचिका दाखल करणार्‍या महिला कर्मचार्‍याला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला.

 

न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमण्यम (Justice SM Subramaniam) यांनी राज्य सरकारला यासंदर्भात चार आठवड्यांत नियम आणि कायदे तयार करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले.
त्यानंतरच या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

 

Web Title :- Madras High court | govt servants should not use phones for personal work during office hours said madras high court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा