Maha Arogya Camp In Pune | कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर ! एक लाख रुग्णांची तपासणी आणि उपचारासाची सुविधा उपलब्ध

गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा – माजी नगरसेवक सनी निम्हण यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maha Arogya Camp In Pune | कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण (Karyaksamrat MLA Vinayak Nimhan) यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्‍वर फाउंडेशनच्यावतीने शिवाजीनगर येथील भोसलेनगरमधील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आज (दि. ६) महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील सुमारे एक लाख जणांची देशभरातील नामांकित डॉक्टरांकडून संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार असून उपचारही करण्यात येणार आहेत. पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे शिबिर असेल. या शिबिराचा अधिकाअधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांनी केले आहे. (Maha Arogya Camp In Pune)

सनी निम्हण यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वस्थ ग्राम – स्वस्थ भारत ही संकल्पना तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे रग्ण सेवा हिच ईश्‍वर सेवा या ब्रिद वाक्यानुसार कार्यसम्राट आमदार कै. विनायक निम्हण यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. (Maha Arogya Camp In Pune)

राज्याचे मंत्री गिरीशी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या शिबिरासाठी भोसलेनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या शिबीराचा भाग म्हणुन रुग्णांसाठी दिनांक २२ जुलै ते ०४ ऑगस्ट दरम्यान शिवाजीनगर पासून सोमेश्वरवाडी,सुतारवाडी, बाणेर, बालेवाडीसह अन्य भागातील ५७ हजार ९६३ रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली. व्दितीय रुग्ण तपासणी अभियानात आवश्यक रक्त, लघवी, ईसीजी, एक्स-रे इत्यादी प्रकारची तपासाणी मोफत करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये विविध आजार आढळलेल्या रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकरवी पुन्हा तपासणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

या शिबिराचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत.

शिबीराचे वैशिष्टे

  • विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
  • ऍलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी विनामुल्य उपलब्ध

*देशातील नामवंत तज्ञ डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ. के.एच संचेती, डॉ.विकास महात्मे डॉ.संचेती, डॉ.यशराज पाटील, डॉ.ललवाणी, डॉ.चंदनवाले, डॉ.तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया.

*गरजु रुग्णांना कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळया यांचे नोंदणीनुसार मोफत वितरण.

कोणत्या तपासण्या होणार

एकुण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश

सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग,
श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुंवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा,
वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार
व शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी,
पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Encounter In Kulgam | कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद; शोध मोहीम सुरूच

India Alliance Meeting | ‘इंडिया’ची तिसरी बैठक मुंबईत, राहुल गांधींसह अनेक नेते उपस्थित राहणार; संजय राऊतांची माहिती (व्हिडीओ)