India Alliance Meeting | ‘इंडिया’ची तिसरी बैठक मुंबईत, राहुल गांधींसह अनेक नेते उपस्थित राहणार; संजय राऊतांची माहिती (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – India Alliance Meeting | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप (BJP) विरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात आधी बिहारमधील पाटणा (Patna) येथे विरोधी पक्षांची बैठक (India Alliance Meeting) झाली. त्यानंतर दुसरी बैठक कर्नाटकातील बंगळुरू (Bangalore) येथे झाली. याच बैठकीत विरोधी पक्षाच्या आघाडीचं ‘INDIA’ असं नाव ठेवण्यात आलं. यानंतर आता विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ची तिसरी बैठक मुंबईत येत्या 31 ऑगस्ट आणि 1 स्पटेंबर रोजी पार पडणार आहे. याबाबतची माहिती ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली.

‘महाविकास आघाडी’ची (Mahavikas Aghadi) बैठक आज मुंबईच्या नेहरू सेंटर येथे पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीबाबत (India Alliance Meeting) माहिती दिली. ते म्हणाले, आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. पाटणा आणि बंगळुरूनंतर आता मुंबईत ‘INDIA’ गटाची तिसरी बैठक पार पडणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel) ही बैठक पार पडेल. 31 ऑगस्टला सायंकाळी ही बैठक सुरु होईल आणि 1 सप्टेंबरलाही बैठक सुरु राहील. 1 तारखेला सकाळी साडेदहा वाजता बैठकीला सुरुवात होईल आणि दुपारी तीन वाजता ही बैठक संपेल. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली जाईल.

यजमानपद शिवसेनेकडे

मुंबईत होणाऱ्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे (Shivsena) (ठाकरे गट) आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हे आमचे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम करणार आहोत. मात्र, कार्यक्रमाचं यजमानपद शिवसेनेकडे (ठाकरे गट) असेल, असं आजच्या बैठकीत ठरल्याचे राऊत यांनी सांगितले. प्रत्येकाकडे कोणत्या जबाबदाऱ्या असतील? याचं वाटपही झालं आहे. पाटणा आणि बंगळुरुप्रमाणे ही बैठक यशस्वीपणे पार पडेल.

आजच्या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेनेकडून सुभाष देसाई (Subhash Desai) आणि अनिल देसाई (Anil Desai) उपस्थित होते. लवकरच आम्ही पुढल्या कामाला सुरुवात करू, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

आम्हाला सरकारचंही सहकार्य हवं

या बैठकीला देशातील किमान पाच राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री (CM) उपस्थित राहणार आहेत.
तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासह अनेक
माजी मुख्यमंत्री आणि प्रमुख नेतेही या बैठकीला उपस्थित असतील. त्यामुळे आम्हाला सरकारचंही सहकार्य हवं आहे.
कारण अनेकांची सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) आम्हाला सहकार्य करावं, त्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असंही संजय राऊत म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Digambar Darade | लंडन, सिगांपूर, जर्मनीतही ऋषी सुनकचा डंका ! पत्रकार दिगंबर दराडेंचे पुस्तक सिंगापूरच्या ग्रंथालयात

Terrorist Arrest In Pune | अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांकडील तपासात महत्वाची माहिती आली समोर, देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट; आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Pune Traffic Updates | ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजी वाहतूकीत बदल

Ajit Pawar On Eknath Shinde | शिवसेना प्रमुख म्हणत अजित पवारांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले…

Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर