Encounter In Kulgam | कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद; शोध मोहीम सुरूच

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Encounter In Kulgam | जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात (Encounter In Kulgam) शुक्रवारी दहशतवाद्यांशी (Terrorist Attack) झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन सुरक्षा जवान (Indian Army) शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे शोध मोहीम सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याच्या माहितीवरून लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये कुलगाम पोलिसांचाही सहभाग होता.

या संदर्भात काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले की, चकमकीत तीन जवान जखमी (Three Army Injured) झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान रात्री त्यांचा मृत्यू (Death) झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान (Encounter In Kulgam) जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीनगर स्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कुलगाममध्ये हलानच्या उंच भागात दहशतवादी
असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली.
दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि उपचारादरम्यान ते शहीद झाले.

दरम्यान, चकमकीच्या ठिकाणी आणखी फौजा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यापूर्वी, काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबा (एलईटी) ची शाखा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती, असे लष्कर अधिकाऱ्याने सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Digambar Darade | लंडन, सिगांपूर, जर्मनीतही ऋषी सुनकचा डंका ! पत्रकार दिगंबर दराडेंचे पुस्तक सिंगापूरच्या ग्रंथालयात

Terrorist Arrest In Pune | अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांकडील तपासात महत्वाची माहिती आली समोर, देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट; आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Pune Traffic Updates | ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजी वाहतूकीत बदल

Ajit Pawar On Eknath Shinde | शिवसेना प्रमुख म्हणत अजित पवारांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले…

Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर