अर्थसंकल्प २०१८-२०१९ : ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारच ‘गिफ्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प २०१८-१९ विधानसभेत मांडला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजच्या अर्थसंकल्पात ओबीसी, धनगर आणि अल्पसंख्याकांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्यासाठी २०० कोटी रुपये देणार असल्याचे सरकाने जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत राज्यात मुला-मुलींसाठी ३६ वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत.

धनगर समाजासाठी या अर्थसंकल्पामध्ये एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे आदिवासी विभागाच्या बजेटला धक्का लागणार नसून ही स्वतंत्र तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आज विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी १०० कोटी तर आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अल्पसंख्यांक समाजातील महिलांच्या कल्याणासाठी १०० कोटीची तरतूद करून मालेगाव येथे आयटीआय सुरु करण्यात येणार आहे.

ओबीसी मुद्यावरुन अजित पवार-मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी
सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या खडाजंगी पहायला मिळाली. ओबीसीसंदर्भातील योजनांचे वाचन करत असताना अचनाक सभागृहात गोंधळ उडाला. त्यामुळे ओबीसींच्या हक्कासाठी घोषणा करताना विरोध बाधा आणत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

You might also like