Maha Vikas Aghadi (MVA) | बारामतीसह काही ठिकाणी आंबेडकर पाठिंबा देतात, तुम्ही अकोल्यात त्यांच्याविरोधात उमेदवार देता, पवारांना ‘या’ नेत्याचे ‘विनंती पत्र’

मुंबई : महाविकास आघाडीच्या Maha Vikas Aghadi (MVA) जागावाटपात वंचित बहुजन आघाडीची Vanchit Bahujan Aghadi (VBA) बोळवण सुरू झाल्याने प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी बारामतीत (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule), कोल्हापुरात (Kolhapur Lok Sabha) शाहु छत्रपती यांना पाठिंबा दिलाय. इतर काही ठिकाणी मविआला पाठिंबा दिला आहे. तर मविआने अकोल्यात (Akola Lok Sabha) प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला. असे असतानाही मविआचे काही नेते वंचितला बी टीम म्हणून हिनवत आहेत. यावर मविआमधील एका नेत्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहून अकोल्यात उमेदवार न देण्याची विनंती केली आहे.

समाजवादी गणराज्य पार्टीचे (Samajwadi Ganrajya Party) अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील (Kapil Patil MLA) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहून काँग्रेसच्या उमेदवाराविरोधातही (Congress) नाराजी व्यक्त केली आहे.

कपिल पाटील यांनी पवारांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे …

म्हणून अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा

आदरणीय श्री. शरद पवार साहेब

सप्रेम नमस्कार,

महाराष्ट्र हा फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही.

नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत.

तथापी या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्याची सल आपल्याही मनात असेल.

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता. आणि सश्रद्ध माणसं मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे समजत नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले – शाहू – आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिलं आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कॉँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत.

अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ – भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही.
पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत.
बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात,
तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर
यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.

आदरणीय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात,
त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं,
संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक
चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त