Mahabharat | ज्यांना खोटे वाटते त्यांनी पहावेत, महाभारत सत्य असल्याचे सिद्ध करणारे पुरावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाभारत (Mahabharat) खरे आहे की खोटे हा प्रश्न नेहमी लोकांमध्ये दिसून येतो, परंतु पुरातत्व आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारवर महाभारत (Mahabharat) सत्य असल्याचे सिद्ध केले असल्याचा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे. महाभारत सत्य आहे, हे दर्शवण्यासाठी महाभारताशी संबंधीत हे 9 पुरावे यासाठी दाखवण्यात येत आहेत…

1. खगोल शास्त्र
खगोल शास्त्रानुसार महाभारतातील युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरला गेले होते, जेव्हा चंद्र रेवती नक्षत्रात होता, भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरला जाताना रस्त्यात विश्रांतीसाठी वृक्षथला येथे थांबले होते आणि त्यादिवशी चंद्र बहरानी नक्षत्रात होता, त्यावेळच्या घटनेची तारीख शोधल्याचा दावा करण्यात आला आहे.

2. कुरुक्षेत्र
कुरुक्षेत्रात झालेला विध्वंस आणि पुरातत्व तज्ज्ञांनुसार तेथील जमीन लाल आढळली आणि तिथे लोखंडाचे बाण आणि भाले जमीनीत गाडलेले आढळले, ज्यांची चाचणी केली असता ते 2800 इ.स. पूर्वीचे सांगण्यात आले, जो महाभारताचा काळ आहे. हे ठिकाण हरियाणा राज्यात आहे.

3. सध्याची अणूशस्त्र
महाभारत काळात ब्रह्मास्त्राचा वापर केला जात होता, ते काही लोकांकडे होते. हे शस्त्र धर्म आणि सत्य कायम राखण्यासाठी ब्रह्मदेवांनी बनवलेले खुपच विनाशकारी अणूशस्त्र होते. हे शस्त्र अचूक आणि भयंकर शस्त्र होते. सध्या ज्या आधुनिक टेक्निकचा वापर केला जात आहे ती महाभारत कालीन आहे.

 

4. महाभारत छंदामध्ये लिहिले गेले

महाभारतात अनेक प्रकारचे छंद लिहिले गेले आहेत जे वाचल्यानंतर एखाद्या कवितेसारखे वाटतात, त्याकाळी कोणतीही गोष्ट कवितेसारखी लिहिली जात होती. गणिताची सूत्र सुद्धा कवितेप्रमाणे लिहिली जात होती.

5. अंगदचा पुरावा
कुंतीचा सर्वात मोठा मुलगा दानशूर कर्ण अंगदचा राजा होता, जे राज्य दुर्योधनाने भेट दिले होते. सध्या ते उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याच्या नावाने ओळखले जाते. जरासंधने आपल्या राज्यातील काही भाग कर्णाला दिल्याचा उल्लेख आहे, जो आज बिहारच्या मूंगेर आणि भागलपुर जिल्ह्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. महाभारत काळात दिल्ली इंद्रप्रस्थ नावाने ओळखली जात होती. आजही अशी ठिकाणे आहेत ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे. द्वारका, बरनावा, कुरुक्षेत्र इत्यादी.

6. चक्रव्यूह दगड
हिमाचल प्रदेशच्या हमीरपुर जिल्ह्यात सोलह सिंगी पर्वताच्या पायथ्याला बसलेले एक गाव आहे जे राजनौण गाव मानले जाते, मान्यतेनुसार पांडव अज्ञातवासा दरम्यान येथे थांबले होते आणि चक्रव्यूहाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी दगडावर चक्रव्यूहाचा नकाशा कोरला होता, जो आजही आहे. यात आत जाण्याचा रस्ता आहे परंतु बाहेर पडण्याचा नाही.

7. लाक्षागृह
महाभारत काळात लाक्षागृहाची भूमिका महत्वाची मानली गेली आहे,
कारण कौरवांनी पांडवांसाठी लाक्षागृह बनवले होते, ज्यामध्ये त्यांना जाळण्याचा कट रचला होता.
परंतु भुयाराच्या माध्यमातून पांडव बाहेर पडले होते, आजही हे भूयार बरनावा नावाच्या ठिकाणी आहे.

8. द्वारका नगरी
भगवान श्री कृष्ण द्वारकेचे राजा होते.
महाभारतात हा उल्लेख आहे. हे नगर जलमय झाले होते.
हे ठिकाण गुजरातजवळ समुद्राच्या खाली आढळले आहे.

 

9. विशाल राजवंश

महाभारताचा वंश राजवंश राजा मनुपासून सुरू होतो आणि या ग्रंथात 50 पेक्षा जास्त वंशाचे वर्णन आहे,
पांडु धृतराष्ट्र सुद्धा या वंशाचे होते.
जर महाभारत एक कथा असती तर लेखात केवळ 5 किंवा 10 राजवंशाचे वर्णन सापडले असते.
यात 50 पेक्षा जास्त राजवंशांचे वर्णन करण्यात आले आहे, यासाठी हे काल्पनिक नाही.

Web Title :- Mahabharat | Those who think it is false should see the proof that Mahabharata is true

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,869 नवीन रुग्ण, तर 8,429 जणांना डिस्चार्ज

Pune Corporation | नागरिकांच्या विरोधामुळे बंद ठेवलेला आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पुन्हा सुरू होणार?

Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार