धुळ्यात दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – महाजनादेश यात्रा आज गुरूवार, दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ४.५० मिनिटांनी धुळ्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन सुरू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रा पुतळ्या जवळ आली असता महाजनादेश यात्रा वाहनातुनच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषा ने परिसर दणाणुन गेला होता.
mahajanadesh-yatara
ढोल, ताशाच्या गजरात रॅलीचे वाजत गाजत स्वागत करत रॅली खंडेराव बाजार चौकात आली. यावेळी इमारतीवर उभे असलेल्या नागरीकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबन चौधरी यांचेवर पुष्पवृष्टी करत स्वागत केले. पुढे रॅलीचे पाचकंदिल चौक, शहर पोलीस चौकी, सराफ बाजार, कराचीवाला चौक, फुलवाला चौक, गांधी चौक या मार्गाने मार्गस्थ लोकांनी पुष्पवृटी, फटाके फोडुन स्वागत केले. लोकांनी रॅलीचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.
Mahajanadesh-Yatra-1
रॅली गांधी चौकातून मोठ्या पुलाहुन देवपूरात मार्गस्थ झाली. रॅलीच्या पुढे मोटरसायकलवर भाजप पक्षाचे कमळ चिन्हांचे झेंडे लावुन डोक्यावर फेटे बांधुन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. देवपुरात पंचवटी चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाजवळ जो. रा. सिटी हायस्कुलच्या विद्यार्थांनी झांज वाजवून रॅली मार्ग दणाणुन सोडला. पाचकंदिल, देवपुर परिसरात जुनी मशीद परिसरातून रॅली मार्गस्थ होताना मुस्लिम बांधवांनी स्वागत केले. नेहरु चौक, दत्तमंदिर चौक, नगावबारी मार्गाने रॅली नगाव गावा जवळ आली. यावेळी रॅलीचे जोरदार स्वागत मनोहर भदाणे, ज्ञानज्योती भदाणे, राम भदाणे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजनादेश रॅली आपण आपल्या पर्यत घेऊन आलो आहे. आपल्या सगळ्यांच्या समस्या मार्गी लावणार, आपल्या सगळ्यांची साथ पुन्हा परत हवी आहे. सगळे साथ देणार ?असा प्रश्न विचारला सगळ्यांनी जोरदार घोषणा देत साद दिली. यानंतर रॅली दोंडाईच्याकडे मार्गस्थ झाली.
mahajansdesh-ytara2
यावेळी चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ. राजु भुजबळ, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, पो. नि. हेमंत पाटील, अभिषेक पाटील, कमांडो पथक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तात सहभागी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश रॅली सोबत वाहनांचा मोठा ताफाही होता.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like