खासदार दिलीप गांधींना धक्का : मुलासह सुनेचाही उमेदवारी अर्ज बाद 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरच नव्हे तर संपूर्ण राज्यभराचे लक्ष अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीकडे लागले आहे. छत्रपती शिवाजी महारांज यांच्याबद्दल अपशब्द उच्चारणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने  प्रभाग ‘९-क’ या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मध्यरात्री खळबळजनक घटना घडली आहे. उमेदवारी अर्ज छाननी नंतर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या मुख्य पक्षांच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले गेले. यामध्ये नगरचे भाजप खासदार व भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या मुलाचा व सुनेच्याही अर्जाचा समावेश आहे. दरम्यान अर्ज बाद झालेले उमेदवार न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.
नगरचे भाजप खासदार व भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा प्रभाग ११ व त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांचा प्रभाग १२ मधील अर्ज बाद झाला. खासदार गांधी यांच्या बंगल्याच्या अतिक्रमण तक्रारीच्या आक्षेपमुळे हे दोन्ही अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज छाननी नंतर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या मुख्य पक्षांच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले गेले. यात भाजपचे ४ तसेच राष्ट्रवादी व सेनेचा प्रत्येकी १ अर्ज आहे. सेनेचे उमेदवार व विद्यमान विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्यासह योगेश चिपाडे (राष्ट्रवादी), सुरेश खरपुडे (भाजप), प्रदिप परदेशी (भाजप) यांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आले.
छिंदमविरोधी भाजप उमेदवाराचाही अर्ज बाद –
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छिंदम याच्याविरोधात सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारल्याने भाजपमधून काढून टाकण्यात आलेला त्यांचा माजी उपमहापौर छिंदम राज्यभरातील शिवप्रेमींकडून टीकेचा धनी झाला आहे. त्याला या वेळी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे त्याने अपक्ष स्वरूपात उमेदवारी दाखल केली आहे. मात्र छिंदम याच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयार असणाऱ्या भाजप उमेदवाराचाही अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात भाजपचा उमेदवार नाही.
 
छिंदमसह २३१ जणांना नोटिसा –
महापालिका निवडणूक काळात तुम्हाला महापालिका हद्दीत प्रवेशास व वास्तव्यास निर्बंध का लादण्यात येवू नये,’ अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा नगरच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी २३१ जणांना पाठविल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणारा भाजपचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यालाही हद्दीपारीच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. दरम्यान, हद्दपारीच्या नोटिसांची संख्या ४८१ झाली असून सुनावणीसाठी नगरच्या प्रांत कार्यालयासमोर गर्दी होत आहे.

शरद पवार-राजू शेट्टी भेट ; ४५ मिनीट चाललेल्या महत्वपूर्ण चर्चेत नेमके काय झाले ? 

You might also like