भिवंडीत गोदामाचा पहिला मजला कोसळला; 8 मजूर ढिगार्‍याखाली अडकल्याची भिती

भिवंडी : भिवंडी येथील मानकोलीमधील हरीहर कंपाऊड येथील गोदामाचा पहिला मजला कोसळला. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

 

 

 

 

गोदामाच्या ढिगार्‍याखाली ७ ते ८ मजूर अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावर भिवंडी अग्निशमन केंद्राचे ३ गाड्या, ठाणे आपत्ती व्यवस्थान कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक मदतीसाठी रवाना झाले आहे. एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरु झाले आहे.