मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बीडकरांना दिला ‘हा’ शब्द

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीडमध्ये पोहचली. यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री व बीडच्या पालकमत्री पंकजा मुंडें आणि खासदार डॉ. प्रीतम मुडें यांनी या यात्रेचे आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात बीड जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करु असा शब्द मराठवाड्यासह बीडच्या जनतेला दिला आहे.

राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा हिशोब देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली आहे. ही यात्रा सोमवारी मराठवाड्यात दाखल झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंची कडा येथे सभा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पाच वर्षामध्ये आम्ही रस्ते, ग्रामीण पायभूत सुविधा दिल्या. पुढील पाच वर्षाच्या काळात मराठवाड्यातील दुष्काळ कायम स्वरुपी नाहीसा करू, यासाठी कोकणातून समुद्राला वाहून जाणेरे पाणी मराठवाड्याकडे वॉटर ग्रिडच्या माध्यमातून वळवू असे आश्वासन देऊन पुन्हा एकदा आशिर्वाद द्या अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्यात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्यासोबत पंकजा मुंडें, राम शिंदे, सुरेश धस व जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार पुढील दोन दिवस उपस्थित राहणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वॉटर ग्रिडच्या माध्यमातून पाणी वळवू अशी महत्वाची घोषणा केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –