गिरीश महाजनांचा उध्दव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘तिजोरीला परवडणारेच निर्णय घेतले जातील’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आश्वासनांचा धुराळा उडाला आहेे. युती झालेल्या भाजप शिवसेनेत शेतकरी कर्जमाफीवरुन मतभेद आहेत असे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या घोषणेवर आता भाजपमधूनच टीका करण्यात आली आहे. या घोषणेवरुन अप्रत्यक्ष चिमटा काढताना गिरीश महाजन म्हणाले की राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील.

जळगावात गिरीश महाजन पत्रकारांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर देखील घणाघाती टीका केली. इतके वर्ष राज्य केले, जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला ओळखता आले नाही. आम्ही ते ओळखले म्हणून किती जागा येतील हे सांगू शकतो. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या घोषणाबाजीवर देखील भाष्य केले.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देणार. दसरा मेळव्यात उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की ते गरिबांना 10 रुपयात थाळी आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी करणार. परंतू या घोषणांवर भाजप नेते मात्र नाराज झाले होते. त्यावर चिमटा म्हणून गिरीश महाजन म्हणाले की राज्याचा तिजोरीला पेलावेल असेच निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे युतीत सर्वकाही अलबेल चालू आहे असे काही दिसून येत नाही.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अक्कलकोट वासियांना आवाहन केले की भाजपला बहुमताने निवडणूक द्या. तर दसरा मेळाव्यात संजय राऊत म्हणाले की यंदाच्या निवडणूकीत शिवसेना 100 च्या पार गेली पाहिजे. आता युतीच्या माध्यमातून भाजप शिवसेना निवडणूकीला सामोरे जात आहेत. यंदाच्या निवडणूक स्वत:च्या पक्षाच्या जागा वाढवण्यावर आणि राज्यातील ताकद वाढण्यावर दोन्ही पक्षांचा जोर दिसून येतोय.

visit : policenama.com