भाजपची तिसरी यादी जाहीर, खडसे अद्याप ‘गॅस’वर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपने आज आपली तिसरी यादी जाहीर केली असून या यादीमध्ये एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आले नाही. भाजपने चार जणांची यादी जाहीर केली असून अद्याप तीन जांगाचा प्रश्न सुटला नसल्याने त्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस शिल्लक राहिला असताना अद्याप तीन जागंवरी उमेदवार निश्चीत झाले नाहीत. रात्री उशीरापर्यंत यादी जाहीर होईल असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपने आज जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमध्ये रामटेक मधून मल्लिकार्झुन रेड्डी, मालाड पश्चिम मधून रमेश ठाकूर, साकोली मधून परिणय फुंके आणि शिरपूर मधून काशिराम पवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पहिल्या यादीमध्ये नाव नसल्याने एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये त्यांचे नाव येईल असे बोलले जात होते मात्र, दुसऱ्या यादीत देखील त्यांचे नाव आले नाही. भाजपने आज तिसरी यादी जाहीर करून खडसे यांना अद्याप गॅसवर ठवले आहे. भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी देणार नसल्याचे सांगून तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला तिकीट देऊ असे सांगून खडसे यांचा पत्ता कट केला आह. दरम्यान, खडसे यांच्या मुलीला तिकीट मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, तिसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये देखील खडसे यांच्या मुलाचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत.

isit : Policenama.com