Maharashtra Assembly Session 2023 | ‘आम्हाला खोके म्हणणाऱ्यांनीच 50 कोटी देण्यासाठी पत्र पाठवलं’, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Assembly Session 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. विधान परिषद मध्ये (Legislative Council) विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचवेळी विधानसभेतही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. आज आठवड्याच्या अंतिम प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना टोमणे मारत राज्य सरकारने (State Government) केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली. (Maharashtra Assembly Session 2023) आमच्या सरकारने चांगलं काम केल्याने विरोधक धास्तावले आहेत, गोंधळलेले आहेत. विरोधकांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

बेईमानी केली कुणी? विश्वासघात कुणी केला? आम्ही ज्यांच्याबरोबर युतीमध्ये निवडून आलो त्यांच्यासोबत युती करुन आम्ही सरकार स्थापन केलं. खूप गोष्टी आहेत, बोलता येतील पण संयम बाळगतो, याचा अर्थ आमच्याकडे माहिती नाही आम्हाला बोलता येत नाही हे कुणी समजू नये, असा अप्रत्यक्ष इशारा ठाकरे गटाला दिला. 50 खोके तुम्ही करता. आरोप करता 50 खोक्यांचा आणि एकीकडे आम्हला रोज शिव्या शाप देता. आमच्याकडेच 50 कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता. हे 50 कोटी रुपये जे शिवसेनेच्या (Shivsena) खात्यामधले आहेत. पत्र आहे की हे 50 कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा. (Maharashtra Assembly Session 2023)

खरे खोके बाज आणि धोकेबाज कोण?

म्हणजे आम्हाला शिव्या द्यायच्या, आम्हाला गद्दार म्हणायचं, आम्हाला खोके म्हणायचं. मग खरे खोके बाज आणि धोकेबाज कोण? मी एक मिनिटाचाही विचार केला नाही मी तात्काळ सांगितलं, त्यांचे देऊन टाका. कारण मी अगोदरच सांगितलं होतं तुमची संपत्ती तुमची प्रॉपर्टी तुमचं काही आम्हाला नको, बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार हीच आमची संपत्ती आहे, असं एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.

कुणाचीही हयगय करणार नाही

कोव्हिडमध्ये (Covid) खराब झालेले ऑक्सीजन प्लांट (Oxygen Plant) वापरले गेले, रुग्णांच डोळे गेले, माणसांचे मृत्यू झाले, असा अहवाल आहे. डेडबॉडीच्या बॅगा साडेचारशे पाचशे रुपयांना मिळतात, इथे सहा हजार रुपयांमध्ये विकत घेण्याचं काम केलं गेलं. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये (Lifeline Hospital) डॉक्टर नव्हते, डॉक्टर दाखवून पैसे काढले. आपल्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिली गेली. ज्यांना अनुभव नाही, त्यांना काम दिली गेली. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. कुणी कितीही आरडाओरडा केला तरी सत्य लपणार नाही. आकसापोटी कुणावरही कारवाई करणार नाही, पण कुणाचीही हयगय करता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

टोमण्यांचा दर्जा वाढला

तुमचं सरकार होतं तेव्हा शासन आपल्या दारी नव्हतं, तेव्हा शासन आपल्या घरी होतं.
दोन वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टींचा दर्जा घसरला शिक्षणाचा घसरला विचारांचा घसरला, आर्थिक गुंतवणुकीचा दर्जा घसरला सगळा दर्जा घसरला आणि टोमण्यांचा दर्जा वाढला, असा निशाणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला.

उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले असा आरोप करण्यात आला.
त्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका काढली. अडीच वर्षात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)
प्रकल्प थांबवले. हे सर्व प्रकल्प इगोमुळे प्रकल्प थांबविले. सगळीकडे आता प्रकल्प सुरू केले आहेत.
24 तास काम करणारे आमचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आम्ही अॅक्शन घेतो, फिल्डवर जाऊन काम करतो, हे सरकार घरी बसून काम करणारे नाही,
असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल

Pune Police MPDA Action | कोंढवा परिसरातील दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 35 वी स्थानबध्दतेची कारवाई