Maharashtra Assembly Winter Session | हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सोमवारी 19 डिसेंबरपासून नागपूरला सुरू होत आहे. हे अधिवेशन होण्याआधीच विरोधकांनी शनिवारी मुंबईत महामोर्चाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे. तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील आखाडा रंगणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांकडे गेल्या सहा महिन्याचे विविध मुद्दे आहेतच. तर सरकारला विरोधकांना तोंड द्यायचे आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर या अधिवेशनाचा कालावधी तीन आठवडे करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) वादळी ठरणार यात काहीच शंका कुशंका नाही.

 

सीमावाद, महागाई, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची बेताल विधाने, मंत्रिमंडळ विस्तार आदी वादावरून विरोधक तयारीला लागले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नावर भूमिका आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका यावरून देखील वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील खडाजंगी पाहण्यास जनता उत्सुक आहे. यापूर्वी विशेष अधिवेशन देखील वादळी ठरले होते. हिवाळी अधिवेशन म्हणजे शिंदे फडणवीस सरकारची दुसरी परीक्षाच आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी नागपुरात चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.
प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी निमंत्रण दिले आहे.
तसेच सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत.
चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
शनिवारी झालेल्या महामोर्चात विरोधकांनी आपली एकजूट दाखवली.
त्यामुळे सत्ताधारी देखील सावध झाले आहेत.

 

 

Web Title :- Maharashtra Assembly Winter Session | winter session will begin in nagpur from tomorrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा