Maharashtra ATS | मुंबईत एकही दशतवादी आला नाही, राज्यात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत – एटीएस प्रमुख विनित अग्रवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईत एकही दहशतवादी (terrorist) आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाही अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (Maharashtra ATS) प्रमुख विनित अग्रवाल (Vineet Agarwal) यांनी दिली. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख (Jan Mohammad Shaikh) याचे वीस वर्षे जुने दाऊद कनेक्शन (David Connection) उघड झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

देशात बॉम्बस्फोट (Bomb blast) घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (Delhi Police Special squad) उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकजण मुंबतील धारावीतील (Dharavi in Mumbai) रहिवासी असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत हल्ला करण्याची योजना असल्याचे समोर आले आहे. मुंबई कनेक्शन समोर आल्यानंतर एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

काय म्हणाले विनित अग्रवाल ?

दिल्ली पोलीसंनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये एकजण मुंबईतील धारावीतला आहे.
त्याचे नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असे आहे.
त्याचे पाकिस्तानातील (Pakistan) डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत.
जवळपास वीस वर्षापासूनचे रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होताच.
पण दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती.
ती सेंट्रल एजन्सीकडे (Central Agency) होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांनी देण्यात आली होती.

 

जान शेखला कोटा येथून अटक

जान शेखने 9 सप्टेंबरला जाण्याचे नियोजन केले होते. त्याने 10 तारखेला पैसे ट्रान्सफर केले.
मात्र त्याचे तिकीट कन्फर्म होत नव्हते. त्याने 13 तारखेच्या वेटिंग लिस्ट सहामध्ये नाव नोंद करीत तिकीट घेतले. गोल्डन टेम्पल एक्सप्रेस (Golden Temple Express) ट्रेनचं त्याने तिकीट घेतले होते.
त्यानंतर संध्याकाळी त्याचं तिकीट कन्फर्म झाल. तो मुंबई सेंट्रलहून एकाटा निजामुद्दीनच्या
(Nizamuddin) दिशेने रवाना झाला.
प्रवासादरम्यान त्याला कोटा येथे अटक करण्यात आली.

हत्यारं किंवा स्फोटकं मिळाली नाहीत

दिल्ली पोलिसांनी त्याला कोटा येथून अटक केली. त्याच्याजवळ हत्यारं किंवा स्फोटकं मिळाली नाही. याबाबतची सर्व माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमची एक टीम आज संध्याकाळी जाणार आहे.
दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देणार आहोत. यानंतर ही केस पुढे कशी जाते ते बघू, असे अग्रवाल यांनी सांगितले.

 

Web Title : Maharashtra ATS | maharashtra ats chief and ADG vineet agarwal on pakistan organized terrorist module

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Satara Co-operative Bank Election | खा. उदयनराजें पुन्हा एकदा निवडणुक रिंगणात; राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण?

Udayanraje Bhonsle | खा. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण

Jalna Crime | पावसामुळे ओला दुष्काळ ! मराठा आरक्षण नसल्याने नोकरी नाही, हवालदिल तरुणाने उचललं टोकाचं पाऊल