Maharashtra BJP MLA | मुंबईत माटूंगा परिसरात राहणार्‍या भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडली पैशांनी भरलेली बॅग; पोलीस तपास सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra BJP MLA | सोने-चांदीच्या मूर्ती आणि पैसे असा ऐवज असलेली एक बॅग भाजपा आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांच्या निवास्थानाबाहेर रविवारी पहाटे सापडली. एका संशयीताला पोलिसांनी हटकले असता तो ही बॅग टाकून पळाल्याचे सांगण्यात आले. हा ऐवज चोरीचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra BJP MLA)

 

भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या निवासस्थानी 24 तास पोलीस संरक्षण असते. पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांनी लाड यांना दूरध्वनी करून निवासस्थानासमोर एक बॅग पडली असल्याची माहिती दिली. त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅग होत्या. पोलिस पथकाने घटनास्थळी बॅगेची पाहणी केली. सोने, चांदी, पैसे, मूर्ती असा ऐवज बॅगेत सापडला. (Maharashtra BJP MLA)

याबाबत माहिती देताना लाड यांनी सांगितले की, संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांना संशयित व्यक्ती दिसली होती. पोलिसांनी त्या व्यक्तीला हटकले असता तो बॅग टाकून पळाला. बॅगेतील सापडलेला ऐवज हा जवळच असलेल्या एका इमारतीतील असावा असा पोलिसांना संशय आहे. कारण या इमारतीमधील घरात चोरी झाली आहे. देवघरातील साहित्य चोरल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे ही चोरीची तक्रार नोंद करण्यात आली होती. माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

 

Web Title :- Maharashtra BJP MLA | a bag full of money and gold found outside
bjp mla prasad lad home in matunga mumbai police searching

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा