Eknath Shinde Group | एकनाथ शिंदे गटातील ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी, मंत्रीपद देऊ नका – भाजप पदाधिकारी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Group | शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वीच जोरदार धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे घरचाच आहेर आहे. भाजपच्या (BJP) ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष व रामटेक (Ramtek) विधानसभा क्षेत्राचे प्रभारी डॉ. राजेश ठाकरे (Dr. Rajesh Thackeray) यांनी शिंदे गटातील रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी हा धमाका केला. आमदार जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी वाळू विक्रीत 150 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. भाजपची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Eknath Shinde Group)

 

पत्रकार परिषद घेऊन भाजपच्याच एका पदाधिकार्‍याने हे गंभीर आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांच्याकडे आ. जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून आ. जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे.

 

डॉ. राजेश ठाकरे यांनी यावेळी मागणी केली की, आ. जयस्वाल यांनी कोट्यवधीचा गैरव्यवहार केला आहे.
त्यांनी कोट्यवधीची जमीन विकत घेतली आहे. त्यांनी नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे. त्यांची ED चौकशी करण्यात यावी.
तसेच सीबीआयनेही चौकशी करावी. (Eknath Shinde Group)

डॉ. ठाकरे पुढे म्हणाले की, आ. जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे.
खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी 150 कोटींचा गैरव्यवहार केला.
खनिज विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरुन सत्तेचा दुरुपयोग केला.
खिंडसी ते वैनगंगा-सूर नदीतील रेती उपसता यावी, यासाठी जयस्वाल यांनी गरिबांच्या घरासाठी मातीमिश्रित वाळूच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या माध्यमातून वाळू तस्करी केली.

 

गंभीर आरोप करताना डॉ. ठाकरे यांनी म्हटले की, जयस्वाल यांनी शेतकर्‍यांकडून धान खरेदी करण्यासाठी मर्जीतील लोकांची खरेदी केंद्र उघडून राज्यातील नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील शेतकर्‍यांकडून आयात केलेले धान्य खरेदी केले.
त्यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. एका शेतकर्‍याचे धानविक्रीचे 14 लाख 52 हजार रुपये जयस्वाल यांनी हडपले.

 

मॅक्सवर्थ कंपनीशी साटेलोटे करून जयस्वाल यांनी अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या नावावर कमी किमतीत खरेदी करून जास्त किमतीत विकल्या. 50 पेक्षा जास्त कंपन्या आ. जयस्वाल यांनी नातेवाईकांच्या नावावर स्थापन केल्या आहेत. लोहकरे हत्याकांड आणि साठवणे हत्याकांडाचेही धागेदोरे आ. जयस्वाल यांच्याशी जुळत आहेत, असा गंभीर आरोप डॉ. ठाकरे यांनी केला आहे.

 

Web Title :- Eknath Shinde Group | bjp office bearer Dr. Rajesh Thackeray allegation against shivsena mla ashish jaiswal nagpur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा